विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी ‘मातोश्री’वर निवडक नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाचा वचकनामा प्रसिद्ध केला. महाराष्ट्र एकसंध राहण्याच्या दृष्टीने अखंड महाराष्ट्रासाठी कटीबद्ध असल्याची ठाम भूमिका सेनेने आपल्या वचकनाम्यात मांडली आहे. तर, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या वैभवात आणि प्रसिद्धीत आणखी भर घालण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. सोबत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक आणि परदेशी पर्यटनांना शिवाजी महाराजांची माहिती देणारे दालन उभारण्याचाही मानस वचकनाम्यात आहे.

शिवसेनेच्या वचकनाम्यातील काही मुद्दे-
– रेसकोर्सवर भव्य थीम पार्क
– पोलीस कर्मचाऱयांना स्वत:चे घर
– सीआरझेडच्या जाचक अटी शिथील करणार
– बिझनेस, अॅग्रीकल्चरल हब तयार करणार
– मुंबईच्या वैभवात आणि सौंदर्य़ात भर देणार
– मरिन ड्राईव्ह ते कांदिवली कोस्टल रोड
– विद्यार्थ्यांना मोफत टॅब
– टेलिमेडिसीन व आरोग्य सेवा सुधारण
– मराठी भाषेला अभिजात दर्जा आणि मराठी भवन उभारणार
– एलबीटी कर रद्द करुन नवी कर प्रणाली
– बाळासाहेबांचे भव्य स्मारक आणि त्यांचे विविध पैलू दाखवणारे विशेष दालन