गोवा सरकारने श्रीराम सेना या संघटनेवर बंदी घातली असून त्याला आव्हान देण्याचे संघटनेने ठरविले आहे. ही बंदी घटनाबाह्य़ असल्याचे संघटनेने म्हटले असून त्याला आव्हान देण्याचे ठरविले आहे. गोव्याच्या उत्तर आणि दक्षिण जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेवर बंदी घातली आहे. या बंदीच्या आदेशात बदल करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनासमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी श्रीराम सेनेला द्यावी, असे संघटनेचे सचिव गंगाधर कुलकर्णी यांनी सांगितले.