शहरातील काही बडय़ा गृहनिर्माण सोसायटीत दिवसाढवळ्या, रात्री अपरात्री असा कधीही प्रचार साहित्य वाटण्यास जाणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सुरक्षतेच्या कारणास्तव सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘नो एन्ट्री’चा बोर्ड दाखविला आहे. त्यामुळे सोसायटीतील छोटय़ा मोठय़ा समस्या निवारणासाठी लोकप्रतिनिधींकडे धाव घेणाऱ्या या पदाधिकाऱ्यांच्याबद्दल इच्छूक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली असून प्रचार साहित्य वाटण्याचे काम मानधन तत्वावर सुरक्षा रक्षकांना देण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
उमेदवारी गृहित धरुन उमेदवारांनी प्रचाराचे काम केव्हाच सुरु केले आहे. यात विद्यमान आमदारांना आपल्या पाच वर्षांतील कार्यअहवाल देणे अगत्याचे वाटू लागल्याने तशा पुस्तिका वाटण्यास गेलेल्या मुंबईतील एका आमदाराच्या कार्यकर्त्यांना हा नो एन्ट्रीचा अनुभव आला.  या आमदारांचा काही भाग हा पवई सारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत येतो. त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते दुपारच्या वेळेस ‘मनसे’ तयार करण्यात आलेला अहवाल देण्यास गेले असता सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी त्याला आक्षेप घेतला. सुरक्षतेच्या कारणास्तव असा अहवाल कार्यकर्त्यांनी दारोदारी फिरुन न वाटता सुरक्षा रक्षकाची डय़ुटी संपल्यानंतर त्यांच्याकरवी वाटला जाईल असा प्रस्ताव या कार्यकर्त्यांसमोर ठेवण्यात आला. यासाठी त्या सुरक्षा रक्षकाला शे-पाचशे रुपये मानधन देण्याची अट देखील घालण्यात आली.  आमच्या सोसायटीतही अशी परवनागी दिली जात नाही, असे ऐरोली येथील सर्वात मोठी गृहनिर्माण सोसायटी असलेल्या यश पॅराडाईज सोसायटीचे उपाध्यक्ष भगवान पाटील यांनी सांगितले.  सोसायटीच्या आवारात सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे पण इमारतीच्या आतील भागात हे कॅमेरे नसल्याने ही काळजी घ्यावी लागत असल्याचे दुसऱ्या एका सोसायटीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. त्बेधडक प्रचार करण्याचे दिवस आता सरले असून आपल्या चाळी, झोपडय़ा बऱ्या अशीच भावना एका आमदाराने व्यक्त केली.

कार्यकर्ते सोसायटीत कोणत्याही वेळी हे प्रचार साहित्य घेऊन घुसतात. त्यामुळे महिला, वृध्द, लहान मुलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वच कार्यकर्ते हे चांगले असतात असे नाही. चोरीच्या उद्देशाने घरांचे टेहळणी करणे हा उद्देशही त्यांचा असू शकतो.
भगवान पाटील, सोसायटी अध्यक्ष

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा