19 November 2017

News Flash

राष्ट्रीय समृद्धीसाठी सागरी सामर्थ्य

मानव जातीचा इतिहास आणि मानवी संघर्ष हा परंपरागतपणे सुरू असलेला अखंडित प्रवास आहे. प्रत्यक्ष

Updated: December 4, 2012 6:46 AM

मानव जातीचा इतिहास आणि मानवी संघर्ष हा परंपरागतपणे सुरू असलेला अखंडित प्रवास आहे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे विविध स्रोतांवर आपला हक्कदाखवणे, यामध्येच या मानवी संघर्षांचे मूळ दडलेले आहे. जमीन, गुरेढोरे, पाणी अथवा मानवाकडून संस्कारित नैसर्गिक घटक तसेच तंत्रज्ञान विकास आदी स्रोत प्रामुख्याने संघर्षांच्या मुळाशी मानले जातात. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला असता कुटुंबापासून कूळ, टोळी, गाव, शहर, राज्ये, देश आणि कालानुरूप त्यानंतर अनेक देशांनी एकत्र येऊन या स्रोतांचा वापर केल्याचे दिसून येते. आजच्या आधुनिक काळात जागतिक स्तरावर स्थूल आर्थिक रचनेचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे उत्तम प्रशासन, सक्षम संरक्षण यंत्रणा आणि देशाची उत्तम ध्येयधोरणे यांच्या योग्य मिलाफातून विकासाचा वेग कायम राखणे शक्य आहे. राष्ट्रीय सुरक्षेवरील खर्च हा अनुत्पादित खर्च असल्याचे वर्णन जगभरातील अनेक अर्थतज्ज्ञ करीत असतात. त्यामुळे देशाच्या आर्थिक नियोजनाचा विचार केला जातो, तेव्हा संरक्षण खर्चाला दुय्यम असे स्थान दिले जाते. मात्र असे असले तरी देशांतर्गत सक्षम कायदा व्यवस्था आणि संतुलित लष्करी दल यामुळे राष्ट्रीय सार्वभौमत्व टिकवून वेगाने आर्थिक विकास साधता येणे शक्य होते, असे मानणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. पुरेशी आणि मोठी लोकसंख्या पायाभूत विकास, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात गुंतवणुकीला आकर्षित करीत असते. १९९१ साली भारतात आर्थिक उदारीकरणाची घोषणा करण्यात आली, तेव्हा भारत गुंतवणूकदारांसाठी मोठे आकर्षण ठरले. त्याचा परिणाम मालाचे उत्पादन आणि कच्च्या मालाच्या व्यापाराला तेजी येऊन आर्थिक वाढीचा दर असाधारण वाढला. मोठया परकीय गुंतवणूकदारांनाही त्याचा फायदा होऊ लागला. त्यामुळे जाणकार अर्थतज्ज्ञ आणि आर्थिक क्षेत्रातील पंडितही भारतीय उत्पादन क्षेत्र आणि बाजाराचा सन्मानजनक उल्लेख करू लागले. गेल्या दोन दशकांत आर्थिक स्थिरताही निर्माण झाली. त्यामुळे आता प्राप्त केलेले हे स्थान अथवा आर्थिक स्थिरता कायम ठेवणे हे मुख्य ध्येय आपल्यासमोर आहे. जागतिक पातळीवर भारताने आíथक क्षेत्रात मिळवलेली प्रगती आता भारतीय नागरिकांनाही अनुभवता येऊ लागली आहे. या जागतिक व्यापाराच्या दळणवळणातील सर्वात मोठा घटक आहे तो म्हणजे समुद्र मार्ग. जगभरातील सुमारे ९५ टक्के व्यापार हा समुद्रमार्गेच होत आहे. व्यापारउदिमाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या समुद्री महामार्गाना आंतरराष्ट्रीय जहाज मार्ग(इंटरनॅशनल शिपिंग लेन) असेही संबोधले जाते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या दहा दशकांच्या कालावधीत भारताने आपल्या ७ हजार ६०० कि.मी. अंतराच्या सागरी किनारपट्टीत १३ मोठे आणि १८७ लहान बंदरे विकसित केली आहेत. या बंदरांच्या माध्यमातून भारताचा तब्बल ९० टक्के व्यापार केला जातो. क्रूड तेल आणि कोळसा या महत्त्वाच्या घटकांची आयात मोठय़ा प्रमाणात समुद्री मार्गेच होते. विकासाच्या दृष्टीने ऊर्जा हा घटक महत्त्वाचा आहे. आज भारत उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. त्यामुळे ऊर्जा आणि आर्थिक सुरक्षिततेसोबत सागरी सुरक्षाही महत्त्वाची ठरू लागली आहे. युद्धजन्य परिस्थिती असो वा नसो, देशाच्या हद्दीतून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुद्री मार्ग (इंटरनॅशनल शिपिंग लेन) तसेच दळणवळणाचा समुद्री मार्ग (सी लाइन ऑफ कम्युनिकेशन) यांच्या सुरक्षेवर अधिकाधिक भर देणे अनिवार्य आहे. अँग्लो-फ्रेंच युद्ध, अँग्लो-डच, अँग्लो- पोर्तुगीज, अँग्लो-स्पेन युद्ध तसेच जागतिक युद्धांचा इतिहास पाहता जमिनीवर ही युद्धे हरली गेली, कारण पराभूत राष्ट्रांना विरोधी राष्ट्रांच्या दळणवळणाच्या समुद्री मार्गावर वर्चस्व मिळवण्यात आलेले अपयश, हे होय. सातत्याने विकास वाढ आणि राष्ट्रीय प्रगतीचा उंचावणारा आलेख कायम ठेवण्यासाठी भारताला आपल्या समुद्री सुरक्षेबाबत कमालीची सतर्कता दाखवावी लागणार आहे. विशेषत: भारतीय महासागर क्षेत्रातील सुरक्षा अबाधित राखून अटलांटिक, भूमध्य आणि प्रशांत महासागरातील सुरक्षा आणि इतर बाबींवरही भर देण्याची गरज आहे. विशेषत: भारतीय महासागरी प्रदेश हा इतर समुद्री प्रदेशांच्या तुलनेत भौगौलिकदृष्टय़ा वेगळा आहे. त्यामुळे या प्रदेशात दळणवळण करण्यासाठी अथवा प्रवेश करण्यासाठी केवळ सात मार्गाचा अवलंब करता येऊ शकतो. यामध्ये पश्चिमेकडे सुएझ कालवा (इजिप्तमार्गे), होरमजची सामुद्रधुनी (ओमान), बाब एल मनदेब (इथिओपिया/येमेन), केप ऑफ गुड होपची सामुद्रधुनी आणि पूर्वेकडे मलाक्का सामुद्रधुनी (सिंगापूर), सुंदा सामुद्रधुनी व लोमबोस सामुद्रधुनी (इंडोनेशिया) या मार्गाचा वापर केला जातो. भारतीय महासागरी प्रदेशातून जगातील सर्वात अधिक मालवाहतूक केली जाते. वर्षभरात ८० हजारहून अधिक जहाजांचा वापर या भागातून होत असतो. जगातील दोन तृतीयांश तेल वाहतूक, एक तृतीयांश मालवाहतूक तसेच अध्र्याहून अधिक कंटेनर वाहतूकही याच महासागरातून होत असते.या महासागरातील २० टक्के व्यापार हा समुद्रतटीय  भागात, तर उर्वरित इतर प्रादेशिक भागांत होतो. त्यामुळे एखादे वेळी मालवाहू जहाज या सामुद्रधुनी मार्गात अडकून पडल्यास त्याचा परिणाम स्थानिक तसेच जागतिक व्यापारावरही होतो.
नैसर्गिक स्रोत लक्षात घेता जागतिक व्यापाराच्या दृष्टीने भारतीय महासागर क्षेत्र अतिशय समृद्ध मानले जाते, कारण या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात तेलाचा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले होते की, जमिनीवर शक्तिशाली असण्यापेक्षा सागरी भागावर वर्चस्व असणे केव्हाही चांगले. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सागरी धोरणे म्हणावी तशी राबवली गेलेली नाहीत, परंतु आता सागरी महत्त्व लक्षात घेऊन अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने सागरी सामथ्र्य वाढविण्यावर भारताने कमालीचा जोर दिला आहे. त्यामुळेच आज जगातील बलवान आणि तंत्रज्ञानाने युक्त लष्करी नौदल भारताकडे आहे.
साठा, युरेनियम, कथिल, सोने, हिरे आदी घटक मोठय़ा प्रमाणात सापडतात. समुद्रतटीय राष्ट्रे मोठय़ा प्रमाणात रबर, चहा, मसाले, ताग यांचे उत्पादन घेतात. महासागराच्या किनारपट्टीवर वसलेल्या खनिजसंपन्न राष्ट्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात मँगनीज, कोबाल्ट, टंगस्टन, कोळसा,लोखंड, धातूपाषाण, बॉक्साईट आदी खनिजे मुबलक आढळतात. भारतीय महासागराच्या क्षेत्रातील २३ लाख ०५ लाख १४३ चौरस कि.मी.च्या खास आर्थिक क्षेत्र (एक्स्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन)आणि ४ लाख २ हजार ९९६ चौरस किमी (कॉन्टिनेन्टल शेल्फ) खंडीय क्षेत्रावर भारताचा दावा आहे. राष्ट्राची परिणामकारक भरभराट होण्यासाठी समुद्र तट आणि या नैसर्गिक खनिजांचे समुद्रीमार्गे होणारा आंतरखंडीय व्यापार यांची सुरक्षा अतिशय आवश्यक मानली जाते. समुद्रातील ही खनिज संपत्ती काढण्याचा आपला मूलभूत अधिकार मानून त्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करणे,यासाठी आपली समुद्री सामर्थ्यांची नितांत गरज असते.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले होते की, जमिनीवर शक्तिशाली असण्यापेक्षा समुद्रावर वर्चस्व असणे केव्हाही चांगले. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सागरी धोरणे म्हणावी तशी राबवली गेलेली नाहीत, परंतु आता सागरी महत्त्व लक्षात घेऊन अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने समुद्री सामथ्र्य वाढविण्यावर भारताने कमालीचा जोर दिला आहे. त्यामुळेच आज जगातील बलवान आणि तंत्रज्ञानाने युक्त लष्करी नौदल भारताकडे आहे. भारतीय नौदल आज कमालीचे सामथ्र्यशाली आहे. त्यामुळे देशाच्या सागरकिनाऱ्याच्या सुरक्षेसोबतच जागतिक पटलावर राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्येही भारतीय नौदल हिरिरीने भाग घेते.
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यांमुळे इतर देशांचा भारतावरील विश्वास वाढला आहे. अनेक देशांचे सैनिक प्रशिक्षणासाठी भारतात येतात, तर परदेशातूनही भारतीय नौदलातील सैनिकांना प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येते. भारतीय नौदल वर्षभर संयुक्त कवायतींसाठी इतर देशांच्या नौदलाला पाचारण करते. तसेच स्वत:ही इतर देशांच्या नौदलांबरोबर संयुक्त कवायती करते.भारतीय नौदल मॉरिशस, मालदीव, सेचेल,श्रीलंका, दक्षिण पूर्व आशियाच्या सामुद्रधुन्या आणि आफ्रिकेतील समुद्रतटीय देशांना सागरी संरक्षण सातत्याने देत आहे. समुद्री दरोडेखोरांविरोधातही भारतीय नौदलाने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. सन २००८ पासून गल्फच्या आखातात भारतीय नौदलाने सुमारे दोन हजार व्यापारी जहाजांची समुद्री दरोडेखोरांपासून संरक्षण केले आहे. समुद्री दरोडेखोरांविरोधात आंतरराष्ट्राय स्तरावर धडक मोहीम राबवून १५०पेक्षा अधिक डाकूंना जेरबंद केले. यामुळेजागतिक पातळीवर भारताचे मोठे कौतुक झाले.भारतीय नौदल जागतिक पातळीवर आपला प्रभाव पाडत असताना देशाच्या सुरक्षेबाबतही तेवढीच जागरूकता दाखवत आहे. त्यामुळे गेल्या काही काळात भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्या अनेक विघातक शक्तींचा बीमोड केला आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने स्थानिक सुरक्षा यंत्रणांबरोबरचा समन्वय अधिक वाढवला आहे. संभाव्य देशविरोधी कारवाया हाणून पाडण्यासाठी नौदलाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या सुरक्षा मोहिमेअंतर्गत कोस्टगार्ड, स्थानिक सुरक्षा यंत्रणा आदींशी समन्वय साधत सुरक्षेचा चोख बंदोबस्त करीत आहे.भविष्यात नौदलाची सुरक्षा यंत्रणा आणखी बळकट होण्यासाठी परदेशी तसेच स्वदेशी तंत्राच्या मदतीने शस्त्रसंपन्न होणे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. युद्धनौकानिर्मितीसाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो. मात्र त्याचा उपयोग नौदलाच्या बळकटीसाठी कायमस्वरूपी होतो, हे लक्षात घेऊनच नौदलाचा विस्तार आणि बळकटीकडे लक्ष देणे म्हणूनच आवश्यक आहे

First Published on December 4, 2012 6:46 am

Web Title: navy power for national abundance