मालिको-सिनेमा क रताना विशिष्ट व्यक्तिरेखांसाठी अभिनेत्री ठरावीक दागिन्यांचा साज चढवतात. खऱ्या आयुष्यात मात्र दागिन्यांविषयीच्या त्यांच्या व्याख्या कोहीशा वेगळ्या आहेत. सोनं असो किंवा डायमंड प्रत्येक दागिन्याची खासियत वेगळीच असते, असं त्यांचं म्हणणं. या वैशिष्टय़ांसह या अभिनेत्री त्यांच्या आवडत्या दागिन्यांविषयी सांगताहेत त्यांच्याच शब्दांत..
ठुशी, चिंचपेटी प्रियमला पारंपरिक दागिन्यांची खूप हौस आहे आणि आवडही. नऊ वारी साडी नेसणं म्हणजे माझं अगदी आवडतं कोम. त्यामुळे आपसूक च पारंपरिक दागिन्यांचीही आवड निर्माण झाली. नऊ वारीचं सौंदर्य खुलतं ते पारंपरिक दागिन्यांमुळेच. या दागिन्यांमध्येच विशिष्ट तेज आहे; जे कोणालाही भुलवतं. ठुशी, कु डय़ा, डुल, चिंचपेटी हे दागिने मला विशेष आवडतात. ठुशीत असलेला डाळिंबी रंगाचा खडा लक्ष वेधून घेतो. ठुशी हा दागिना तसा म्हटलं तर नाजूक म्हटलं तर ठसठशीत. पण या नाजूक , ठसठशीतपणात त्याचं सौंदर्य लपत नाही. कोही ठुशींमध्ये असलेलं पेडंटही फोर गोड वाटतं. ठुशीला शोभून दिसतील असे डुल किं वा कु डय़ा असं घातलं की चेहऱ्यातलं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. मोत्याची चिंचपेटी हाही माझ्या आवडत्या दागिन्यांमधला एक दागिना. चिंचपेटी गळ्याला वेगळा लुक देतो. एरवी गळ्यातले इतर दागिने थोडे सैल घातले जातात. पण चिंचपेटी हा घट्ट नाही, पण गळ्याला पक्को बसेल असा घातला जातो. त्यामुळे रिकोमा गळा एक दम भरलेला वाटू लागतो. यातही मोत्याची चिंचपेटी मला अधिक आवडते. यालाही शोभून दिसतील असे डुल घातले की झालं, चेहरा एक दम खुललाच म्हणून समजा. पण आता या पारंपरिक दागिन्यांमध्येही विविध प्रयोग होताना दिसतात. आधुनिक तेचा आधार घेत यात थोडेफोर बदल के ले जातात. मला क ोणतीही गोष्ट जशी असते तशीच स्वीकोरायला आवडते. तसंच पारंपरिक दागिन्यांचंही आहे. पण कोळानुरू प माणसाने बदलायला हवं हेही तितकं च खरं. जुनं धरू न ठेवावंच, पण नवं कोही चांगलं असेल तर त्याचा स्वीकोरही क रावा. त्यामुळे पारंपरिक दागिन्यांमध्ये नवीन चांगले बदल होत असतील आणि लोक ते स्वीकोरत असतील तर ते निश्चितच वारंवार घडले पाहिजेत. मलाही जर एखादा प्रयोग आवडला तर मी तो स्वीकोरतेच. याशिवाय मला बारीक डिझाइनच्या बांगडय़ा आवडतात. माझ्या शरीराची ठेवण नाजूक असल्यामुळे मला बारीक डिझाइन्सच्याच बांगडय़ा शोभून दिसतात. प्लॅटिनममध्ये मला डायमंड खूप आवडतं. माझा जेव्हा के व्हा साखरपुडा ठरेल तेव्हा माझ्या या आवडीविषयी मी जो क ोणी असेल त्याला सांगणार आहे. बघू या, या सांगण्यामुळे त्याला कोही क ळतं को ते..!
– ऋतुजा बागवे
झुमको गिरा रे..पारंपरिक दागिने मला प्रचंड आवडतात. त्यातही झुमके हा माझा सगळ्यात आवडता दागिना आहे. वेगवेगळ्या डिझाइन्सच्या झुमक्यांचं माझ्याक डे मोठं क लेक्शन आहे. मी कु ठे बाहेर गेले की खरेदी तर होतंच असते. त्यावेळी क पडय़ांच्या खरेदीसोबत मी झुमक्यांचीही खरेदी करत असते. जिथे जिथे मला वेगळे, आक र्षक झुमके दिसतील ते मी घेते. यामुळेच माझ्याक डचा झुमक्यांचा संग्रह वाढतोय. या संग्रहातले सगळेच झुमके मी क धी घालेन हे मला माहीत नाही. पण संग्रह क रायला नक्की आवडतं. पुरस्कोर सोहळ्यांना, समारंभांना किं वा अन्य कोर्यक्र मांना साडी नेसून जायचं असेल तर मी आधी झुमके ठरवते आणि मग साडी. झुमक्यांनुसार क ोणती साडी नेसायची हे ठरवलं जातं. त्यामुळे साडय़ांपेक्षा झुमक्यांना मी जास्त भाव देते असं मी नेहमी गमतीने म्हणते.
झुमक्यांमध्येही वेगवेगळे प्रकोर आहेत. फ क्त मोत्यांचे आणि सोनं- मोतीमिश्रित असे झुमके . मोत्यांचे झुमके जास्त सुंदर दिसतात. पारंपरिक दागिन्यांमध्ये आता वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. दागिन्यांचा आकोर, धातू, स्टाइल यात बदल के ले जातात. पण मला वाटतं, की पारंपरिक दागिना जसा आहे तसाच घालावा. त्यातच खरं सौंदर्य आहे. प्रयोग के लेल्या झुमक्यांमध्ये तितकोसा गोडवा वाटत नाही. पारंपरिक झुमके घातले की चेहऱ्यालाही एक वेगळाच गोडवा येतो. झुमक्यानंतर मला दागिन्यांमध्ये तोडे खूप आवडतात. त्यातसुद्धा मला सोन्याची झालर असलेले मोत्यांचे तोडे आवडतात. मला एकू णच पारंपरिक दागिन्यांमध्ये मोत्यांचं वेड आहे. त्यामुळे मोत्यांनाच मी अनेक दा प्राधान्य देत असते. मोती असतात फोर गोड. टपोरे मोती तर आक र्षित क रतात. पांढरे, पिवळसर, पाणीदार असे सगळ्याच रंगांचे मोती मला खूप आवडतात. आणि त्यातले दागिने तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.-
पूजा सावंत
पैंजण माझ्या आवडीचेप्रत्येक दागिन्याचं एक वेगळंच सौंदर्य असतं. मला सोनं आणि डायमंड्स असे दोन्ही आवडतात. मला चोक र्सही आवडतात. मग ते सोन्याचे असो किं वा डायमंड्सचे. त्यातलं सौंदर्य आणखी वेगळं जाणवतं. पैंजण हा माझा सगळ्यात आवडता दागिना आहे. पण माझं एक स्वप्नं राहिलंय. माझे आत्तापर्यंत सगळे दागिने क रू न झालेत. पण सोन्याचे पैंजण मात्र क रायचे राहून गेलेत. खरं तर पायात सोनं घालू नये असं म्हणतात. पण मला आवडतं ते. फोर गोड दिसेल ते. इतर वेळी दागिने घालताना क ोणती साडी नेसली आहे हे महत्त्वाचं ठरतं. भरपूर दागिने आहेत म्हणून ते घालणं हा विचार चुकीचाच आहे. त्या त्या साडीचं एक वैशिष्टय़ असतं. त्यामुळे त्यानुसार दागिने घातले की साडीचीही शोभा वाढते आणि आपणही छान दिसतो. डिझायनर किंवा टिशूची वगैरे साडी असेल तर डायमंड किं वा चोक र्सचे दागिने छान वाटतात. इमिटेशन ज्वेलरी मला अजिबात आवडत नाही. मी इमिटेशन ज्वेलरी क धीच घालत नाही. एक तर खरा दागिना घालते नाहीतर कोहीच नाही हे माझं तत्त्व आहे. मला झुमके ही खूप आवडतात. त्यातही सिल्व्हर झुमके तर मस्तच वाटतात. झुमक्यांमुळे चेहऱ्याला एक दम वेगळाच लुक येतो. कोठपदराची आणि प्लेन अशा दोन प्रकोरच्या साडय़ांना मी प्राधान्य देते. प्लेन साडी नेसली तर त्यावर डिझायनर ब्लाऊ ज असतो. या पेहरावानुसार दागिन्यांचा साज ठरवते. मला वाटतं क ोणताही दागिना आवडता असला तरी त्या त्या पेहरावानुसार दागिने ठरवावेत. त्यामुळे क पडे आणि व्यक्ती दोन्हींचं सौंदर्य उठून दिसतं. जाड डिझाइन्सचे कोनातले घातले व गळ्यात नाजूक कोहीतरी घातलं तरी ते चांगलंच दिसतं. बांगडय़ांमध्ये मला पिचोडी आवडते. ती एक जरी घातली तरी ते खूप छानच दिसतं. फोर देखणं दिसतं ते.
– सुचित्रा बांदेकर