उंचीच्या आकडेवारीची गंमत
सन १८५०मध्ये सर्वोच्च शिखर म्हणून एव्हरेस्टचा शोध लागल्यावर त्याची त्या वेळी घेतलेली उंची ही २९००२ फूट होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ‘सव्र्हे ऑफ इंडिया’तर्फे हिमालयाच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतीय सव्र्हेअर बी. एल. गुलाटी यांनी एव्हरेस्टची उंची मोजत ती २९०२८ असल्याचे जाहीर केले. १९७५मध्ये चीननेही या शिखराची उंची मोजत त्याच्या माथ्यावर ट्रायपॉड (तिकांडे) बसवले. १९९२मध्ये अमेरिकेच्या वतीने टॉड बस्लन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोहिमेत नव्या तंत्रज्ञानानुसार एव्हरेस्टची उंची पुन्हा एकदा मोजून ती २९०२८ फूट असल्याचे जाहीर करण्यात आले. १९९९ साली अमेरिकेच्याच आणखी एका मोहिमेने उपग्रह तंत्रज्ञानाची मदत घेत एव्हरेस्टची उंची मोजली आणि ती २९०३५ फूट भरली. अचूक तंत्रज्ञानावर जाहीर करण्यात आलेला उंचीचा हा आकडाच सध्या सर्वत्र ग्राहय़ धरला जात आहे.

भौगोलिक रचना
– नेपाळ आणि तिबेटच्या मध्यभागी एव्हरेस्ट पर्वतरांग वसलेली आहे.
ल्ल या पर्वतरांगेवर जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर, तर त्याला लागूनच ल्होत्से आणि नुप्त्से ही अन्य दोन अतिउंच शिखरे.
– सर्वोच्च स्थानामुळे एव्हरेस्टला जगातील तिसरा ध्रुव असेही म्हणतात. दोन जमिनीवरील तर उर्वरित अवकाशातील.
ल्ल हा पर्वत स्थानिक लोकांमध्ये ‘चोमोलुंग्मा’ देवीच्या नावाने ओळखला जातो. ही ‘चोमोलुंग्मा’ म्हणजे स्वर्गाची देवी. म्हणून या शिखराला पुढे ‘स्वर्गमाथा’ असे म्हटले जाऊ लागले. या ‘स्वर्गमाथा’चाच पुढे सगरमाथा आणि आता सागरमाथा असा अपभ्रंश झाला आहे.
‘एव्हरेस्ट’चा शोध
– सन १८५०च्या आसपास त्या वेळेच्या ब्रिटिश सरकारच्या ‘सव्र्हे ऑफ इंडिया’ या सरकारी विभागातर्फे हिमालयाच्या रांगांचे सर्वेक्षण सुरू होते. हे सर्वेक्षण सुरू असतानाच राधानाथ सिखधर या एका भारतीय कर्मचाऱ्यास हिमालय रांगांतील ‘त्या’ शिखराचा शोध लागला. तत्कालीन साधनांद्वारे त्या वेळी त्याची उंची मोजण्यात आली असता ती भरली तब्बल २९००२ फूट! जगातील ही सर्वोच्च जागा म्हणून तिची १८५२ मध्ये अधिकृत घोषणा झाली.
– या सर्वोच्च जागेचा शोध लागल्यावर १८६५मध्ये ब्रिटिशांनी या शिखराला ‘सव्र्हे ऑफ इंडिया’चे पहिले महासंचालक सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव बहाल केले. अशा रीतीने ‘माऊंट एव्हरेस्ट’चा जन्म झाला.
‘एव्हरेस्ट’वरील चढाई
– जगातील सर्वोच्च शिखर सापडल्याच्या बातमीपाठोपाठ ते सर करण्याचे प्रयत्न सुरू.  सन १८९३ साली तत्कालीन ब्रिटिश सेनाधिकारी चार्ल्स ब्रुस आणि गव्हर्नर जनरल फ्रान्सिस यंगहजबंड यांनी हे शिखर सर करण्याचा निर्णय जाहीर केला. यासाठी कर्नल ब्रुसने सुरुवातीला या पर्वतीय प्रदेशाचे नकाशे तयार केले. याआधारे ते तब्बल १९४०० फूट उंचीपर्यंत पोहोचले. खरेतर हिमालयातील ही तेव्हाची सर्वात उंचीवरची चढाई होती.
– पुढे १९१३ साली कॅप्टन जॉन नोएल या ब्रिटिश सेनाधिकाऱ्यानेही बंदी असलेल्या तिबेट मार्गे वेशांतर करत एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला. अपयश आले तरी तो या शिखराच्या तब्बल ६० मैलांपर्यंत पोहोचला होता.
– १९२१ ते १९४९ दरम्यान ब्रिटिशांकडून सलग आठ मोहिमा. सर्व मोहिमा अपयशी तरी त्यातून ‘एव्हरेस्ट’चा मोठा अभ्यास झाला.
– १९५२ मध्ये स्वित्र्झलडची पहिली मोहीम. यात रेमाँ लॅम्बर्ट या गिर्यारोहकाने शेर्पा तेनसिंगसोबत तब्बल २८३०० फुटांपर्यंत मजल मारली. आजवरच्या चढाईचा हा विक्रमच होता.
– ब्रिटिशांची १९५३ साली पूर्ण तयारीनिशी नवी मोहीम. कर्नल जॉन हंट यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या मोहिमेत ब्रिटिश गिर्यारोहक डॉ. चार्ल्स एव्हन्स आणि टॉम बर्डिलिअन यांच्यासह न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि भारतीय शेर्पा तेनसिंग नोर्गे हे दोघेही होते. २६ मे १९५३पर्यंत हे चौघे या शिखराच्या अगदी जवळ पोहोचले होते. पण याचवेळी कृत्रिम ऑक्सिजनच्या पुरवठय़ात दोष झाल्याने दोन्ही ब्रिटिश गिर्यारोहकांना माघार घ्यावी लागली, तर हिलरी आणि तेनसिंग यांनी पुढील तीन दिवसांत उर्वरित चढाई पूर्ण करत या सर्वोच्च शिखरावर मानवाचे पहिले पाऊल टाकले. यापुढील वर्तमान सर्वानाच माहीत आहे.