तेजस्वी तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा उपक्रम म्हणजे ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’. उद्योग, विज्ञान, क्रीडा क्षेत्रातील आणखी काही ‘लोकसत्ता तरुण तेजांकितां’शी पुनर्भेट.

डॉ. अपूर्व खरे  (संशोधक)

२०१८

Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
Loksatta lokshivar Successful experiment of organic farming by farmers for increased production in agriculture
सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग!

सध्या बंगळूरु येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये गणित विषयाच्या सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अपूर्व खरे याला २०१८ साली ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. 

शेअर बाजार चढणार की कोसळणार? ते तापमान वाढीचा कल कसा असेल? अशा अनेक विषयांचे विश्लेषण हे गणितीय समीकरणाच्या आधारे कसे करता येऊ शकते, यावर अपूर्वने संशोधन केले आहे. त्याने ‘मॅथमॅटिक्स इन रिअल वल्र्ड’ हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. अपूर्व खरे याला २०१८ साली रामानुजन पाठय़वृत्ती, २०२० साली स्वर्णजयंती पाठय़वृत्ती, २०२२ साली इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसची पाठय़वृत्ती मिळाली असून विविध देशांमध्ये त्याने व्याख्यानेही दिली आहेत. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत ‘पन्नाशीच्या आतील ७५ वैज्ञानिक’ या कॉफीटेबल पुस्तकाची निर्मिती केली होती. या कॉफीटेबल पुस्तकामध्ये डॉ. अपूर्व खरे यांच्यावर आधारित लेख आहे. २०२३ मध्ये त्याला ‘शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.

अम्रिता हाजरा (संशोधक)

२०१८

समतोल किंवा पौष्टिक आहार ही रोजच्या जगण्यातील गरज. पण त्यावर बोलून थांबण्यापेक्षा शास्त्रज्ञ अम्रिता हाजरा हिने पौष्टिकता कुठल्या आहारातून, कशा पद्धतीने मिळेल, त्याचा आहार घेणाऱ्याला आणि धान्य पिकवणाऱ्यालाही फायदा कसा होईल याचे गणित संशोधनातून मांडले. २०१८ मध्ये तिला ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

पुण्यातल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर) रसायनशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून अम्रिता कार्यरत आहेत. अम्रिताने काही वर्षांपूर्वीच कॅलिफोर्नियात ‘द मिलेट प्रोजेक्ट’ हा प्रकल्प यशस्वीरीत्या राबवला. अमृताच्या संशोधनामुळे भरडधान्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. भारतात २०१८ हे वर्ष ‘मिलेट इयर’ किंवा ‘तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आले, तर संयुक्त राष्ट्रसंघाकडून २०२३ हे वर्ष ‘तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहीर करण्यात आले. त्यामुळे तृणधान्याचा आहारातील समावेश, त्याची उपयुक्तता याबाबत बरीच चर्चा झाली. अम्रिताचे तिच्या संशोधन क्षेत्रात आणखी संशोधन सुरू असून अनेक शोधनिबंध प्रतिष्ठेच्या संशोधनपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

भक्ती कुलकर्णी (बुद्धिबळपटू)

२०१९

भारतीय बुद्धिबळाने गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने प्रगती केली आहे. २०२१ मध्ये भारतीय बुद्धिबळ संघाने ‘फिडे’ ऑलिम्पियाड आणि जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद या बुद्धिबळ स्पर्धामध्ये दमदार कामगिरी करताना अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदके पटकावली होती. भारताच्या या यशात गोव्याच्या भक्ती कुलकर्णीचे मोलाचे योगदान होते. भक्तीला २०१९ मध्ये ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

२०२१ च्या सप्टेंबरमध्ये झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भक्तीने पाचपैकी चार सामने जिंकले होते. तसेच जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेच्या साखळी फेरीत चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे भारतीय संघाने बाद फेरी गाठली आणि मग ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच या स्पर्धेत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली. २०२२ मध्ये मायदेशात झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारताच्या महिला ‘अ’ संघाने कांस्यपदक मिळवले आणि भक्तीने संपूर्ण स्पर्धेत पाचपैकी चार सामने जिंकले. या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल भक्तीला २०२२ अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पल्लवी उटगी  (उद्योजक)

२०२२

अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन वेगळी वाट धुंडाळणारी नाशिकची पल्लवी उटगी २०२२ मध्ये ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सन्मानाची मानकरी ठरली. बाळांना नैसर्गिक विधीसाठी एकदा वापरून विल्हेवाट लावाव्या लागणाऱ्या ‘डिस्पोजेबल डायपर’ला पर्याय म्हणून तिने सुती कपडय़ापासून तयार केलेल्या डायपर्सचा ‘सुपरबॉटम्स’ ब्रँड पुढे आणला. हे डायपर धुऊन कितीही वेळा सहजपणे वापरता येतात.  मऊ कापडाचे काही थर आणि त्यावर कोरडेपणा देणाऱ्या कापडाचा थर असतो. तोही कापडाचा असल्याने त्वचेला नुकसान होत नाही.  महानगरांपुरताच मर्यादित असणारा आमचा ब्रँड राज्यात लहान शहरांपर्यंत पोहोचल्याचे ती सांगते. या डायपर्सला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन तिने नवनवीन उत्पादने बाजारात आणली. विशेष मुलांसाठी डायपरची निर्मिती केली. ‘डाऊन सिंड्रोम’ आजाराने ग्रस्त व्यक्तीला आयुष्यभर डायपर वापरावे लागतात. त्यांच्यासाठी खास कापडी डायपर तयार केले.  दोन वर्षांपुढील मुलांसाठी अंतर्वस्त्रे, कोरडेपणाची अनुभूती देणारे लंगोट आदींची निर्मिती तिने केली आहे.