‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ म्हणजे वेगळं काही करू पाहणारे कर्तृत्ववान तरुण. ‘लोकसत्ता’ अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर आणत आहे. आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..

घोंगडी विणणे आणि गोधडी शिवणे या हळूहळू लुप्त होत चाललेल्या अस्सल भारतीय कला. त्या जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत नीरज बोराटे यांचे ‘मदर क्विल्ट्स’ आणि ‘घोंगडी डॉट कॉम.’

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारामुळे ‘मदर क्विल्ट्स’ आणि ‘घोंगडी डॉट कॉम’ हे दोन्ही उपक्रम घराघरांत पोहोचले. त्यामुळे तोपर्यंत केलेल्या सगळय़ा मेहनतीचे सार्थक झाल्याची भावना नीरज व्यक्त करतो. ‘तरुण तेजांकित’ मिळाल्यानंतरचा बराच काळ करोना आणि टाळेबंदीमध्ये गेला. त्यामुळे आपला व्यवसाय कसा पुढे जाणार ही धाकधूक होती. मात्र समाजमाध्यमे आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अनेक ग्राहक जोडले गेले. त्यांनी घोंगडी, गोधडी यांची खरेदी केली. त्यांनी तयार केलेल्या  योगा मॅट्स, गोधडीच्या पर्स, लॅपटॉप बॅग, गालिचे अशा अनेक कल्पक गोष्टी ग्राहकांच्या पसंतीच उतरू लागल्या आहेत. त्यामुळे आमच्या कारागिरांना आम्ही योग्य मोबदला देऊ शकलो, अशी कृतज्ञ भावना नीरज व्यक्त करतो. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांतील गोधडी, घोंगडी या उत्पादनांची निर्यात २५ टक्क्यांपर्यंत वाढली. मागील सात ते आठ वर्षांच्या त्यांच्या कामाची दखल घेऊन ‘मदर क्विल्ट्स’ आणि ‘घोंगडी डॉट कॉम’ हे दोन्ही उपक्रम महाराष्ट्र सरकारच्या काही उपक्रमांबरोबर जोडले गेले. आमच्या कारागिरांसाठी ही बाब आनंद आणि अभिमानाची आहे, असे नीरज यांनी सांगितल़े

नीरज बोराटे  लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१९

नव्या नाटकाचे वेध

प्राजक्त देशमुख हे सध्या मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव आहे. भद्रकाली प्रॉडक्शनच्या वतीने सादर झालेले त्याचे पहिलेच व्यावसायिक नाटक ‘संगीत देवबाभळी’ समीक्षक आणि रसिक दोहोंच्याही पसंतीस उतरले. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत त्याची ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ ही एकांकिका महाविजेती ठरली. हे नाटक पुस्तकरूपीही आले असून या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. टाळेबंदीच्या काळात प्राजक्तने नाटक लिहिले असून ते नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. वर्षभरात एक प्रायोगिक आणि एक व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आणण्याचा त्याचा मानस आहे. कुणी चांगले लिहिलेले नाटक जर माझ्याकडे आले तर ते  दिग्दर्शित करण्याची इच्छा प्राजक्तने बोलून दाखवली. लवकरच त्याचे लिहिलेले ‘गोदावरी’ आणि ‘हर हर महादेव’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. कथा-पटकथा-संवाद प्राजक्तचा असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट नदीकाठावरील एका कुटुंबाची कथा सांगतो. त्याशिवाय ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले असून दिवाळीच्या दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे

प्राजक्त देशमुख लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१९

भारताच्या यशात मोलाचे योगदान!

भारतीय बुद्धिबळाने गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने प्रगती केली आहे. मागील वर्षी भारताने ‘फिडे’ ऑलिम्पियाड आणि जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद या बुद्धिबळ स्पर्धामध्ये दमदार कामगिरी करताना अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदके पटकावली. भारताच्या या यशात भक्ती कुलकर्णीचे मोलाचे योगदान होते. भक्तीला २०१९च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात सातत्य राखण्यात यश आले आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भक्तीने पाचपैकी चार सामने जिंकले. तसेच जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेच्या साखळी फेरीत भक्तीने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघाने बाद फेरी गाठली आणि मग ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच या स्पर्धेत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली. या स्पर्धेनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक अभिजित कुंटे यांनी भक्तीची स्तुतीही केली होती. आता कामगिरी अधिक उंचावण्याचा तिचा मानस आहे.

भक्ती कुलकर्णी लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१९

प्रायोजक

*  मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) 

*  सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि., वल्र्ड वेब सोल्युशन्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

*  पॉवर्ड बाय :  महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.