21 October 2020

News Flash

नया है यह : कॅनन कनेक्ट स्टेशन सीएस १००

कॅनन सीएस १०० कनेक्ट स्टेशनमधील फोटो आणि व्हिडीओ वायरलेस पद्धतीने अ‍ॅक्सेस करता येतील.

कॅनन सीएस १०० हे कनेक्ट स्टेशन वेगवेगळ्या डिव्हाइसमधील फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करण्याचं वनस्टॉप सोल्युशन आहे. जवळपास एक टीबीपर्यंत साठवणुकीची क्षमता असणाऱ्या या कनेक्ट स्टेशनमधील फोटो आणि व्हिडीओ वायरलेस पद्धतीने अ‍ॅक्सेस करता येतील. विविध डिव्हाइसशी शेअर करण्याच्या सुविधेबरोबरच यातील फोटो, व्हिडीओ थेट सोशल नेटवर्कवरदेखील पोस्ट करता येतील. दोन वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या कनेक्ट स्टेशनच्या सेटअपचा वापर करून परदेशातील कुणाहीसोबत तुम्ही तुमचे फोटो, व्हिडीओ शेअर करू शकता.

वैशिष्टय़ं :

१. संग्रह – एनएफसी/वाय-फाय सुविधा असलेल्या कॅमेऱ्यामधील डेटाची कोणत्याही वायरलेस पद्धतीने देवाणघेवाण होऊ शकते. एसडी/एसडीएचसी/एसडीएक्ससी/सीएफ ही मेमरी काडर्स बिल्ट इन मेमरी कार्ड स्लॉटच्यामार्फत सीएस १०० मध्ये वापरता येतील. महिना, वर्ष आणि कॅमेऱ्यानुसार फोटो फाइल्सचं वर्गीकरण केलं जातं. १ टीबी इतक्या साठवणूक क्षमतेनुसार सीएस १०० साधारणत: दीड लाख फोटो (एक फोटो ६.६ एमबीचा) आणि ७० तासांचे व्हिडीओज (एक एचडी व्हिडीओ सरासरी ब्रिटेट ३२ एमबीपीएस) साठवता येतील.

२. व्ह्य़ूविंग  – सीएस १०० हे एचडी टीव्हीला जोडले जाऊ शकते. यामुळे मोठय़ा स्क्रीनवर तुम्हाला छायाचित्रं आणि व्हिडीओज पाहण्याचा आनंद घेता येईल.

३. शेअरिंग – कॅमेऱ्यात काढलेले फोटो स्मार्टफोन किंवा टॅबलेटमध्ये बघता येऊ शकतात. कॅनन इमेज गेटवे (सीआयजी-उ्रॅ) ऑनलाइन फोटो अल्बममध्ये कटेंट अपलोड करता येऊ शकतो. तिथून हाच कटेंट सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करता येतो. योग्य त्या कॅननच्याच वाय-फाय प्रिंटरमार्फत फोटो वायरलेस प्रिंट करता येतात.

४. सोपी आणि सोयीची कनेक्टिव्हिटी – एनएफसी (निअर फिल्ड कम्युनिकेशन) सुविधा असणारे आणि २०१५ साली बाजारात आलेले कॅनन कॅमेरे आणि कॅमकॉर्डर्समधील फोटोज आणि व्हिडीओज वायरलेस पद्धतीने सहज ट्रान्स्फर करता येतील. तसेच २०१० व नंतरच्या उपकरणांसाठी यूएसबी कनेक्शनचा स्लॉटदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सीएस १०० ची किंमत रु. २४,२९९/- आहे.

प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2016 1:14 am

Web Title: canon connect station cs100 review
टॅग Camera,Photography
Next Stories
1 नेट कट्टा : स्पर्धेपेक्षा जगणं महत्त्वाचं…
2 श्रद्धांजली : असे लोक जात नाहीत…
3 इंटिरियर : बिंदूपासून सुरुवात
Just Now!
X