लहानपणीच्या आठवणी येताच आठवतात ते बालपणीचे खेळ, काढलेल्या खोडय़ा, आवडीचा खाऊ आणि तेव्हा आवडीने पाहिले जाणारे काही निवडक कार्टून्ससुद्धा. टॉम अ‍ॅन्ड जेरी, पॉपाय, पॉवरपफ गर्ल्स, डेक्स्टर आणि बऱ्याच इतर कार्टून्सने मला टीव्हीसमोर खिळवून ठेवलं होतं. पण माझ्या सगळ्यात जास्त लक्षात राहिलेलं कार्टून म्हणजे ‘द रिची रिच!’

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण

मनोरंजन हा प्रमुख उद्देश असणाऱ्या या कार्टूनने काही छान गुणही मुलांना शिकवले. परोपकार करत राहावा, श्रीमंतीचा गर्व नसावा, बुद्धीचा योग्य वापर करावा अशा अनेक शिकवणी रिची रिच या कार्टूनमधून मिळाल्या. रिचीचे अंकल-आंटी, वॅन डव फॅमिली, ग्लोरिया, मायडा, कॅप्टन फझबि, जेनी अशा अनेक पात्रांनी रिची रिच हे कार्टून समृद्ध होते. हे कार्टून पाहताना हरवून जायला व्हायचे, पण खूप काही शिकायलाही मिळायचे. हे कार्टून आता पाहायला मिळत नसल्याची खंत वाटते. लहानपणी आपल्या सगळ्यांनाच पैशांचे, श्रीमंतीचे, ऐशोरामाचे अप्रूप असते. आपण स्वप्नांच्या जगात रमतो. असेच स्वप्नवत जग मुलांना दाखवले ते रिची रिचने. कार्टून सुरू होताच दिसायचा तो त्याचा भव्य बंगला आणि आजूबाजूचा सुंदर परिसर. बंगल्याचा आतील भाग तर सगळ्या सुखसोयींनी परिपूर्ण असा होता. तो बंगला पाहताच आपणही अशाच ठिकाणी राहावे, अशी प्रत्येकाची इच्छा झाल्याशिवाय राहिली नसावी.

रिचीचा हेवा तेव्हा जास्त वाटायचा जेव्हा तो फक्त त्याला हवे तेव्हाच त्याच्या बंगल्याच्या परिसरात असणाऱ्या शाळेत जायचा. सगळ्यात मजेशीर होता तो त्याचा कुत्रा ‘डॉलर’; ज्याच्या अंगावर ठिपक्यांऐवजी डॉलरचं चिन्ह असायचे. तो जेव्हा घाबरायचा तेव्हा ते डॉलर पडायचे. त्याचा भित्रेपणा पाहून खूप हसू यायचं. रिचीचा बटलर कॅडबरी त्याच्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेण्यात तत्पर असायचा. अती श्रीमंतीमुळे त्याचे अनेक शत्रूदेखील होते. त्या शत्रूकडून होणाऱ्या डावपेचातून त्याला सोडवण्यात अग्रेसर होते ते म्हणजे प्रोफेसर कीनबीन आणि रिचीची नोकर आयरोना. प्रोफेसर कीनबीन यांनी बनवलेली उपकरणे पाहून फार गंमत वाटायची. कोणत्याही प्रकारच्या संकटांवर मात करण्यासाठी ते सहज उपकरणे बनवत. आयरोना आठवते ती तिच्या रोबोटिक हालचाली तसेच आवाजांमुळे. असाच एखादा रोबोट आपल्याकडे असता तर? असा विचार करूनच कल्पनांचे बंगले बांधले जायचे. रिची रिचचे आई-वडील कायम त्याला प्रोत्साहन द्यायचे. त्यांना आपल्या श्रीमंतीचा गर्व असल्याचे कधीच जाणवले नाही. त्यांचे हेच गुण रिचीमध्येही दिसले. रिची रिचच्या आठवणी त्याच्या श्रीमंतीसारख्याच अखंड आमच्या मनात घर करून आहेत.
प्रतिमा दातार तांबट