आशीष ठाकूर – response.lokprabha@expressindia.com
गुंतवणूकदाराला बाजारात टिकून राहण्यासाठी तर्कसंगत विचारसरणीच्या विरोधात कृतीची गरज आहे; तरच तो भांडवली बाजारात यशस्वी होईल.

भांडवली बाजाराचे व्यवहार हे तर्कसंगत विचारसरणीच्या विरोधात चालतात. हे समजून घेण्यासाठी बाजाराच्या प्रचलित म्हणी, वाक्प्रचारांचा आधार घेऊ या.

१) ऐकीव बातम्यांवर समभाग खरेदी करा व तीच बातमी प्रत्यक्षात आली की समभाग विका.  (ऑन रूमर यू हॅव टू बाय ऑन न्यूज यू हॅव टू सेल).

कंपनीला भरभरून ऑर्डर मिळाल्याने कंपनीला चांगले दिवस येणार म्हणून गुंतवणूकदार समभाग खरेदी करतो व बिचाऱ्याचे वाईट दिवस सुरू होतात असं का?

कंपनीची बारीकसारीक, खडान्खडा माहिती ठेवणारे चाणाक्ष गुंतवणूकदार त्यांच्या माहीतगार सूत्रांकडून वरील माहिती गोळा करत असतात. ते हा समभाग बातम्यांच्या प्रकाशझोतात नसताना खरेदी करत असतात. या प्रक्रियेत सामान्य गुंतवणूकदारांनी कसं सहभागी व्हायचं तर, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेता जेव्हा एखाद्या कंपनीचा भाव स्थिर असतो, पण उलाढाल (व्हॉल्युम) वाढायला लागते. आदल्या दिवशीपेक्षा व्हॉल्युम दुप्पट होतो व तोच प्रत्यक्ष ताबा घेणार असे संकेत मिळतात. (शेअर डिलिव्हरी माìकग) तेव्हा गुंतवणूक योग्य रकमेचे चार तुकडय़ात विभागून प्रत्येक घसरणीत हा समभाग खरेदी करावा. जेव्हा सुखद बातम्या यायला लागतात, तेव्हा समभाग झपाटय़ाने वाढतो, तेव्हा विक्री करून फायदा पदरात पाडून घ्यावा. या कल्पनेचा विस्तार म्हणजे दुसरी म्हण.

२) सुखद, प्रसन्न बातम्यांवर बाजार उच्चांक मारतो व अतिशय निराशाजनक, रक्तपाताच्या (ब्लडबाथ) दिवसात बाजार नीचांक प्रस्थापित करतो. (ऑन युफोरिया मार्केट फॉर्म टॉप अ‍ॅण्ड इन पॅनिक मार्केट फॉर्म बॉटम)

चाणाक्ष (सीझन्ड) गुंतवणूकदार, परकीय गुंतवणूक संस्था, भारतीय म्युच्युअल फंड हे नेहमी बाजार कोसळत असताना चांगल्या, दर्जेदार कंपन्यांचे समभाग खरेदी करत असतात. याचं मुख्य कारण त्यांना हवी असलेली लाखो, करोडो समभागाची संख्या (बल्क क्वांटिटी) ही मातीमोल किमतीत मिळत असते व कोसळलेल्या बाजाराला सावरण्याचं पुण्यदेखील पदरी पडते. कालांतराने तेजी अवतरते तेव्हा मातीमोल किमतीत घेतलेले समभाग घसघशीत नफ्यात विकून म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देता येतो. तेव्हा बहुतांश वेळेला प्रचलित पद्धतीविरोधात (कॉन्ट्रेरीयन कॉल) आपली वर्तणूक असेल तरच या बाजारात सामान्य गुंतवणूकदार पसे कमवू शकतो.

३) समभाग उच्चांकापासूनच्या किमतीपेक्षा अध्र्या, पाव, किमतीत मिळत होता व नंतर पुन्हा खरेदी केला (अ‍ॅवरेज) :  समभागाच्या किमतीचा चढ-उतार हा कंपनीच्या आíथक कामगिरीवरून ठरत असतो.  यासाठी आपण खालील शृंखला (चेन) समजून घेऊ या.

प्रथम कंपनीला ऑर्डर मिळते. ती कार्यान्वित होत असताना आणखी ऑर्डर्स मिळतात (ज्या मध्ये नफ्याचं वाढीव प्रमाण असते). या सर्व ऑर्डर पूर्ण करण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज लागणार, त्यासाठी अग्रहक्क समभागातून (राईट इश्यू) ने उभं केलं जाणार.  हे पूर्ण करून घेण्यासाठी कामगारांना अधिक वेतन अधिक भत्ते (ओव्हरटाइम) दिले जाणार. या सर्वातून ऑर्डर वेळेत पूर्ण होणार, ज्यातून वाढता नफा – लाभांश मिळणार. थोडक्यात, कंपनीच्या समभागाला सतत वाढती मागणी राहणार. त्यामुळे हा समभाग नेहमीच चढा राहणार.

याबरोबर उलट स्थिती कधीकधी असते. ती म्हणजे कंपनीकडे ऑडर्स कमी असतात. आहे त्या ऑर्डर, नियम व अटी पालन न केल्यामुळे ग्राहकांकडून रद्द होतात. त्यात दंडात्मक कारवाई झाली तर त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे फायदा कमी होतो अथवा पूर्ण तोटाच होतो. त्यामुळे कंपनीला बँकांकडून खेळत्या भांडवलासाठी कर्ज मिळत नाही. याचा थेट परिणाम कामगारांच्या वेतनावर होतो. दोन ते तीन महिन्यांचा पगार थकल्यावर संप, टाळेबंदी वगैरे प्रकार सुरू होऊ शकतात. त्यामुळे बँकांचे अगोदरच्या कर्जाचे हप्ते फेडण्यात अपयश येत. त्यामुळे बुडीत कर्ज म्हणून संबंधित कर्ज खात्याची गणना होते. बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू होतो. या सर्वाचा एकत्रित परिणाम होऊन समभागाचा भाव कोसळायला लागतो. भाव उच्चांकापासून अध्र्या, पाव, किमतीला उपलब्ध होतो. त्या समभागासंबंधीचे हे सगळे  निराशाजनक तपशील माहीत असल्यामुळे तो समभाग कुणीही घेत नाही. त्यामुळे तो समभाग स्वस्तात मिळत असतो.  हा मुद्दा समजण्यासाठी आपण किंगफिशर एअरलाईनचं उदाहरण घेऊ या. समभागाचा भाव रु. ८० वरून ४०, – ४० वरून २०, २० वरून १०, १० वरून पाच व शेवटी पाच वरून रु. अडीचला समभागाची बाजारातली नोंदणी रद्द झाली.  त्यामुळे तो अध्र्या किमतीत समभाग मिळत आहे,  या मोहापायी आपण आपलं मुद्दल गमवून बसतो. म्हणून कोसळणाऱ्या बाजारात मंदीचा समभाग खरेदी करू नये व आणखी स्वस्त झाल्यावर तर अजिबातच खरेदी करू नये. (इन फॉिलग मार्केट नेव्हर बाय अ‍ॅण्ड अ‍ॅवरेज वीक शेअर्स).

तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टीने उपाय :  त्रमासिक निकालानंतर प्रथितयश कंपन्या अथवा उद्योन्मुख क्षेत्रातील कंपन्यांवर (सनराईझ सेक्टर) नजर ठेवून त्या मंदीत अथवा त्रमासिक निकालानंतर पंधरा दिवसानी समभाग खरेदी करावेत. त्या वेळेला त्या कंपनीच्या समभागाचा बाजारभाव २००, १००, ५०, २० असा दिवसाच्या चलत सरासरीवर (मूिवग अ‍ॅवरेज) असावा. कंपनीवर कर्ज नसावं, तसेच प्र्वतकांचा (प्रमोटर) भरीव हिस्सा असावा व कंपनी सातत्याने लाभांश देणारी असावी.  मंदीत हा समभाग घेऊन अध्रे समभाग नेहमी ४० ते ५० टक्के नफा झाल्यावर विकावेत. (१०० समभागातील ५० समभाग) पुन्हा भाव खाली आल्यावर खरेदी करावेत. असं करत ५० टक्क्य़ांच्या नफ्याच्या तीन ते चार फेऱ्यांमध्ये जे दीर्घकालीन ५० समभाग ठेवलेले आहेत, त्यांचं मुद्दल आपण बाजूला काढू शकतो. असं केल्यामुळे काय होईल तर दुर्दैवाने गीतांजली जेम्स, वक्रांगी लिमिटेडसारखे आíथक अपघात झाले तर मुद्दल सुरक्षित राहील. याउलट त्या कंपन्या भविष्यात नावारूपाला (मल्टी बॅगर) झाल्या तर ती निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाची सोय असेल.

बाजारात यशस्वी व्हायचं असेल तर नेहमी तर्कसंगत विचारसरणीच्या विरोधात (कॉन्ट्रेरीयन कॉल) कृती असावी.  हे मनावर िबबवण्यासाठी एकच बोलकं राजकीय उदाहरण देतो. ते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील आदरणीय, उत्तुंग व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचं असेल तर, ते जे बोलतात त्याच्याबरोबर उलट अशी त्यांची कृती असते. याच दृष्टिकोनातून त्यांच्या विधानांकडे बघितलं जातं. पण म्हणून ते आजतागायत टिकून आहेत. गुंतवणूकदारालाही बाजारात टिकून राहण्यासाठी तर्कसंगत विचारसरणीच्या विरोधात कृतीची गरज आहे; तरच तो भांडवली बाजारात यशस्वी होईल.

(वरील लेख तांत्रिक विश्लेषणांच्या पुस्तकातून)

(लेखक भांडवली बाजाराचे विश्लेषक आहे.)

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत.  अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते.  हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस व इच्छित उद्दिष्ट या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे.  गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.