25 February 2021

News Flash

रुचकर – शॉपिंग विशेष : शाही फ्रूट बॉल्स

खवा परतून घ्यावा. त्यातच पनीर कुस्करून परतावे. थंड करावे.

शाही फ्रूट बॉल्स

साहित्य:

१ वाटी खवा,   १ वाटी पनीर,

१ वाटी पिठी साखर,     अननसाचे तुकडे,

जरुरीप्रमाणे बदाम,      पिस्ते तुकडे,

केशर, वेलची पावडर,

१/४ चमचा रोझ इसेन्स.  आंब्याच्या फोडी/मोसमाप्रमाणे फळं,

कृती:

खवा परतून घ्यावा. त्यातच पनीर कुस्करून परतावे. थंड करावे. त्यात पिठीसाखर घालून हलकेपणाने मळावे, रोझ इसेल्स घालावे, केशर दुधामध्ये भिजत घालावे. पनीरचे गोळे करून प्रत्येक गोळ्यामध्ये पायनापल व बदामाचा तुकडा घालून गोळा बंद करावा. असे आंब्याचे पण करावे. थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. वरून वेलची पावडर, पिस्ते घालावे, केशर शिंपडावे.

या गोळ्यावर तयार रबडी घालून ही डिश अजून शाही करता येईल.

चेरी- चीज- पायनापल करंजी

साहित्य:

२०० ग्रॅम मैदा, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट,

३ टेबल स्पून,   पायनापल प्रत्येक १ वाटी चिरून,

तूप,   बदाम-काजू तुकडे १ वाटी,

मीठ चिमटीभर, मैदा भिजवण्यापुरते दूध,

चेरी,   तळण्यासाठी तूप,

चीज,   १/४ डबा कंडेन्स्ड मिल्क

२ चमचे मध,

कृती:

मैद्यामध्ये मीठ घालून तूप गरम करून मैद्याला चोळावे. दुधाने मैदा घट्टसर भिजवावा व चांगला मळावा.  चेरीचे बारीक तुकडे करावे, अननसाचे पण बारीक तुकडे करावे, चीज किसावे, त्यात डेसिकेटेड कोकोनट, कंडेन्स मिल्क, वेलची पावडर १ चमचा, मध एकत्र करून गरम करून एकजीव करून थंड होण्यासाठी ठेवावे. मैद्याच्या पुऱ्या लाटून त्यात वरील सारण १ ते २ चमचे भरून करंजी करावी. गरम तुपामध्ये मंदाग्नीवर तळाव्या. या करंज्या नेहमीच्या करंजीपेक्षा वेगळ्या, चविष्ट लागतात.

रसगुल्ला विथ आइस्क्रीम

साहित्य:

१० तयार रसगुल्ले.      कुठलेही आइस्क्रीम.,

चॉकलेट किसून, चेरी,

टुटीफ्रुटी. फळं- रंगीबेरंगी रंगाची चौकोनी तुकडे करून,

कृती:

रसगुल्ले दाबून त्यातील पाक काढून टाकावा. एका रसगुल्ल्याचे चार तुकडे कापावे. बाऊलमध्ये हे तुकडे रचावे. त्यावर व्हनिला आइस्क्रीम घालावे (थोडेसे) त्यावर फळं, परत आइस्क्रीम, वरून किसलेले चॉकलेट व चेरी, टुटीफ्रुटी घालून हे छान झटपट डेझर्ट थंड करून सव्‍‌र्ह करावे.

केसर संदेश

साहित्य:

२५० ग्रॅम पनीर, १/२ डबा कंडेन्स्ड मिल्क,

२ टेबल स्पून मिल्क पावडर,     २ चमचे कॉर्नफ्लॉवर,

केसर चिमूटभर, दुधामध्ये भिजवून ठेवावे,

केवडा इसेन्स ४ थेंब,

पिस्ते व बदाम बारीक तुकडे सजावटीसाठी.

कृती:

पनीर, कंडेन्स्ड मिल्क, मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर एकत्र मिक्सरमध्ये फिरवावे. कढईमध्ये मिश्रण गरम करावे. ओलसर असताना ट्रेवर थापावे. वरून सुकामेवा भुरभुरावा. थंड २-३ तास ठेवून नंतर आवडीचा आकार कापावा.

वेलवेट चॉकलेट मूस

साहित्य:

२५० ग्रॅम फ्रेश क्रीम,

१०० ग्रॅम डार्क चॉकलेट,

२ टेबल स्पून,

कंडेन्स्ड मिल्क,

१ चमचा जिलेटिन (गरम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवावे),

१/२ वाटी पिठी साखर,

१ चमचा व्हॅनिला इसेन्स,

२ चमचे बटर.

कृती:

पॅनमध्ये क्रीम, कंडेन्स मिल्क, साखर, चॉकलेटचे तुकडे, इसेन्स व बटर एकत्र करून गरम करावे. मिश्रण कोमट झाल्यावर भिजवावे. जिलेटिन घालून मिश्रण छान एकजीव करावे. मोल्डला बटरने ग्रिस करून त्यामध्ये तयार मिश्रण घालून सेट करण्यासाठी १ ते २ तास ठेवावे.

वरून क्रीमने सजवून त्यावर चेरीज लावाव्या. हा डेझर्टचा प्रकार मुलांना फारच आवडतो.

गुलकंद रसमलई

साहित्य:

२५० ग्रॅम पनीर, एक चमचा मैदा,

पाव चमचा बेकिंग पावडर,       पाव कप कंडेन्स्ड मिल्क,

दूध अर्धा लिटर, गुलकंद जरुरीप्रमाणे,

साखर- २०० ग्रॅम,      रोज इसेन्स ३-४ थेंब,

पिस्ते-बदाम सजावटीसाठी.

कृती:

पनीर चांगले तळावे. त्यात मैदा व बेकिंग पावडर घालावी. छोटय़ा गोळ्याची वाटी करून त्यात अर्धा चमचा गुलकंद भरून गोळा बंद करावा. असे सर्व गोळ्याचे करावे. साखर व एक कप पाण्याचा साधा पाक करावा- उकळी आल्यावर तयार गोळे त्यात सोडावे. एक मिनीट झाकण लावून उकळावे. दूध उकळत त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून थोडी साखर, केशर घालून थोडे आटवावे. थंड झाल्यावर त्यात तयार रसगुल्ले घालून, फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवावे.

शाही तुकडा

साहित्य:

४ ते ५ ब्रेडच्या स्लाइस कडा काढून.

१ वाटी तयार रबडी,     ४ चमचे साजूक तूप,

१ वाटी साखर, वेलची पावडर,

केशर, पिस्ते

कृती:

साखरेमध्ये थोडे पाणी घालून पाक करावा. त्यात केशर घालावे, ब्रेडच्या स्लाइजना पॅनवर तूप घालून भाजावे व एका ब्रेडचे चार तुकडे कापावे. एका पसरट डिशमध्ये तुकडे रचावे. प्रत्येक तुकडे तयार पाकामध्ये बुडवून डिशमध्ये वरून तयार रबडी घालून त्यावर भरपूर बदाम, पिस्ते, केशर घालून सजवावे. थंड करावे. झटपट करण्यासारखा पदार्थ आहे.

कबाब लहुसनवी

साहित्य:

१/४ किलो पनीर,       २ चमचे बटर.

१/२ चमचे दालचिनी पावडर,     २ चमचे घट्ट दही,

१५-२० लसूण पाकळ्या बारीक चिरून,     १ चमचा लिंबुरस,

१ चमचा मिरची पेस्ट किंवा चिली सॉस,   चवीप्रमाणे मीठ,

धना-जिरा पावडर १/२ चमचा.

कृती:

बटरवर पनीरचे चौकोनी तुकडे परतावेत. काढावे. त्याच बटरमध्ये लसूण लालसर होईस्तोवर परतावा. दही, मीठ, मसाले, लिंबू रस सर्व पनीरला चोळावे. स्टीकला पनीरचे तुकडे खेचून ओव्हनमध्ये/ पॅनमध्ये थोडय़ा तेलावर फ्राय करावे. कांदा, लिंबू, सॅलॅडबरोबर सव्‍‌र्ह करा.

ओनिअन चीज रोल्स

साहित्य:

दोन कांदे बारीक चिरून, एक वाटी ओलं खोबरं,

२-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,     कोथिंबीर,

गोळा भिजवण्यासाठी एक वाटी मैदा,      एक वाटी कॉर्नफ्लोअर,

मीठ चवीप्रमाणे, एक चमचा मिरी पावडर,

चीझ स्लाईस्ड/ किसलेले कोणतेही चीझ,    साखर एक चमचा,

मोहन २ मोठे चमचे,    तळण्यासाठी तेल.

कृती:

मैद्यामध्ये मीठ आणि तेलाचे मोहन घालून मैदय़ाला चोळावे. त्यात कॉर्नफ्लॉवर घालून पीठ एकत्र करून पाण्याने घट्ट गोळा भिजवावा. आता कांदा, खोबरं, मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर, मिरी पावडर, एक चमचा लिंबाचा रस (ऑप्शनल), चीझ तयार ठेवावा. गोळ्याच्या छोटय़ा छोटय़ा पुऱ्या लाटाव्या, त्यावर खोबऱ्याचे एक चमचा मिश्रण ठेवून त्यावर चीझ ठेवावे, पुरीची गुंडाळी करून, कडांना पाणी लावून कडा चिकटवाव्या, गरम तेलमध्ये तांबूस रंगावर रोल्स तळावे. सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर सव्‍‌र्ह करावे.

खुसखुशीत चिरोटे

साहित्य:

एक वाटी मैदा,

एक वाटी रवा,

तीन चमचे तुपाचे मोहन,

मीठ,

थंड पाणी,

तळण्यासाठी तूप

साटय़ासाठी साहित्य:

दोन टेबल स्पून साजूक तूप,

दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर,

रोझ इसेन्स पाव चमचा

पाकासाठी:      सजावटीसाठी:

दीड वाटी,      पिस्ते,

साखर, बदाम कातरून

पाणी-साखर भिजेल इतपत गुलाबपाकळ्या

कृती:

मैदा व रवा एकत्र करून त्यात मीठ घालावे तूप गरम करून घालून मैद्याला चोळावे. थंड पाण्याने गोळा भिजवून ठेवावा. ओल्या फडक्याने झाकून ठेवावे. (तीन ते चार तास) नंतर गोळा चांगला मऊसर होईस्तोवर मळावा, पोळीसाठी लागतात तेवढे गोळे करून पातळ लाटावे. आता पहिल्या दोन पोळ्या घ्याव्या. त्याआधी साटय़ाचे तूप फेटून त्यात कॉर्नफ्लॉवर व इसेन्स घालावा. गोळा करावा. पहिल्या पोळीला यातील थोडा साटा अंदाजाने लावून त्यावर दुसरी पोळी ठेवून त्यावरसुद्धा साटा पसरावा. घट्ट गुंडाळी करावी, १-१ इंचाचे तुकडे कापावे. अर्धा तास हे सर्व तुकडे फ्रिजमध्ये ठेवावे. बटर काढून प्रत्येक गोळा थोडय़ाशा मैद्यावर हलकेपणे गोल किंवा चौकोनी आकारात लाटावा. गरम तेलावर किंवा तुपावर तळावे. गरम तेल चिरोटय़ावर उडवत राहावे म्हणजे पापुद्रे सुटतील. असे करत असताना पाक करून घ्यावा, त्यात गरम तळलेले चिरोटे घालून मुरू द्यावे. बाहेर काढून त्यावर बदाम-पिस्ते, गुलाब पाकळ्या टाकून सजवावे. (रंगीत हवे असल्यास पीठ मळताना आवडीचा रंग घालावा)

शेवेची बर्फी

हा पदार्थ पंजाबी असून, करण्यास सोपा पण तितकाच चविष्ट असा आहे.

साहित्य:

पाच किलो मशीन शेव- बारीक झीरो नंबरची शेव. त्यात मीठ घातलेले नसते.

दोन चमचे साजूक तूप,

अर्धा वाटी साखर,

१०० ग्रॅम खवा,

अर्धा वाटी दूध,

ड्रायफ्रुट्स सजावटीसाठी,

३/४ चमचे केवडा किंवा रोझ इसेन्स.

कृती:

प्रथम शेव कोरडीच रंग न बदलता भाजून घ्यावी. बाजूला ठेवावी. नंतर खवा, दूध व तूप एकत्र करून जरा गरम करावे. त्यात साखर घालावी. थोडय़ा दुधामध्ये थोडं केशर भिजत ठेवावे. दुधाचे मिश्रण एकजीव झाल्यावर थंड होऊ द्यावे. लगेच शेव घालून मिश्रण एकत्र करावे. त्यात बदामाचे तुकडे, बेदाणा व केशराचे दूध घालून तूप लावलेल्या थाळीमध्ये छापावे, वरून बदाम, पिस्ते व केशर टाकून सजवावे. या बर्फीला आवर्जून चांदीच्या वर्खाने सजवतात. त्यामुळे बर्फी अधिकच खुलून दिसते.

चॉकलेट रमबॉल्स

साहित्य:

चॉकलेट केकच्या ४ स्लाइस,

एक चमचा रम किंवा रम इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स,

एक वाटी चॉकलेट शेव (बाजारामध्ये उपलब्ध),

एक वाटी चॉकलेटचे तुकडे (गुलिंग चॉकलेट),

दोन टेबल स्पून क्रीम,

भरपूर आक्रोडाचा चुरा

कृती:

मायक्रो ओव्हनमध्ये चॉकलेट वितळून घ्यावे. थंड झाल्यावर त्यात इसेन्स, केकच्या स्लाईसचा चुरा, क्रीम, आक्रोडाचा चुरा एकत्र करून गोळे करावेत. चॉकलेटच्या शेवेमध्ये प्रत्येक गोळा घालावा, फ्रिजमध्ये ठेवावे. हे रमबॉल्स छोटय़ाबरोबर मोठय़ांनापण आवडतात.

मँगो चीज केक

साहित्य:

१० डायजेस्टिव्ह बिस्किट्स- क्रश करून

दोन चमचे बटर पातळ करून,

१०० ग्रॅम किंवा १ कप आंब्याचा पल्प,

अर्धा चमचा मँगो इसेन्स,

१०० ग्रॅम पनीर,

एक कप दूध,

एक चमचा कॉर्नफ्लोअवर,

१० ग्रॅम जिलेटीन,

१ कप दही,

पाणी काढून चक्का करावे.

अर्धी वाटी साखर.

टॉपिंगसाठी:

एक चमचा मँगो जेली,

अर्धा वाटी आंब्याच्या फोडी.

कृती:

प्रथम बिस्किटाच्या चुऱ्यामध्ये बटर घालून हाताने एकजीव करावे. केकच्या रुंद टीनमध्ये हे मिश्रण दाबून ठेवावे. फ्रिजमध्ये अर्धा ते एक तास ठेवावे. जिलेटीनमध्ये कोमट पाणी (दोन टेबल स्पून) घालून ठेवावे. ३० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये गरम करावे. दूध गरम करावे. थोडय़ा दुधामध्ये कॉर्नफ्लोअर फेसळून गरम दुधामध्ये घालून मिश्रण शिजवावे. एका मोठय़ा बाऊलमध्ये दही, किसलेलं पनीर, मँगो पल्प, इसेन्स, जिलेटिन व कॉर्नफ्लोअरचे मिश्रण एकत्र करून मिक्सी फिरवावा. मिश्रण एकजीव करावे. फ्रिजमध्ये ठेवलेले बिस्किटाचा टीज बाहेर काढून त्यावर वरील मिश्रण ओतावे. वरून फॉइल लावून फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवावे. स्लाइज कापून त्यावर टॉपिंग पसरावे. सव्‍‌र्ह करावे.

केसरिया कबाब

साहित्य:

२ बटाटे उकडून,

कुस्करून लगदा,

२ गाजरे बारीक किसून केलेला कीस,

१ बीट किसलेले,

१ कांदा बारीक चिरलेला,

१ चमचा जिरा पावडर,

१ वाटी पनीर किसलेले,

१ वाटी डाळ्यांचे (फुटाण्याचे) पीठ,

२ चमचे आले-लसूण पेस्ट,

१ लिंबाचा रस,

१ चमचा गरम मसाला,

मीठ चवीप्रमाणे,

ब्रेडक्रम्स.

कृती:

सर्व भाज्या व पनीर एकत्र करावे. त्यात कांदा, सर्व मसाले, फुटाण्याचे पीठ, आले-लसूण पेस्ट, मीठ घालून मिश्रणाचा गोळा करून त्यात लिंबाचा रस घालावा व आवडीप्रमाणे कटलेटचा आकार करावा, ब्रेडमध्ये घालावे. पॅनमध्ये श्ॉलोफ्राय करावे. कांदा, हिरव्या चटणीबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करावे.

कॉर्न इन व्हाइट सॉस

साहित्य:

एक वाटी अमेरिकन कॉर्न,

उकडून,

एक वाटी किसलेलं चीझ,

१ कांदा बारीक चिरलेला, मीठ,

साखर, मिरी पावडर अर्धा चमचा,

१ कप दूध,     अर्धा चमचा मिक्सड हर्ब,

१ कप दूध,     बटर,

एक चमचा कॉर्नफ्लॉवर

कृती:

बटरवर कांदा परतावा. त्यावर कॉर्न परतावा. मीठ, मिरी पावडर, साखर, दूध व कॉर्नफ्लॉवर घालून मिश्रण शिजवावे, हर्ब घालावी. छोटय़ा ट्रेला बटर लावून त्यावर वरील मिश्रण घालून त्यावर चीझ पसरावे. गरम केलेल्या ओव्हनमध्ये १६० डिग्री अंश सेल्सिअसवर बेक करावे. टोस्ट किंवा ब्रेडबरोबर गरम गरम खावे.
सुलेखा कारखानीस – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:16 am

Web Title: food recipe diwali 2016 shahi fruit balls
Next Stories
1 रुचकर – शॉपिंग विशेष : सात पडी पुरी
2 रुचकर – शॉपिंग विशेष : झटपट बेसन वडी
3 रुचकर – शॉपिंग विशेष : जाफरानी पेढा
Just Now!
X