18 February 2019

News Flash

श्रावणासाठी आगळंवेगळं

धार्मिकदृष्टया महत्त्वाच्या अशा या काळात आहारही सात्त्विक घ्यायचा असतो.

आजकाल आपल्याकडे मिळू शकणारे इतर देशामधले खाद्यपदार्थ वापरूनही सात्त्विक श्रावण साजरा करता येऊ शकतो.

रुचकर विशेष
विवेक फडणीस – response.lokprabha@expressindia.com
श्रावण या शब्दाला आपल्याकडे एक अर्थपूर्ण छटा आहे. धार्मिकदृष्टया महत्त्वाच्या अशा या काळात आहारही सात्त्विक घ्यायचा असतो. आजकाल आपल्याकडे मिळू शकणारे इतर देशामधले खाद्यपदार्थ वापरूनही सात्त्विक श्रावण साजरा करता येऊ शकतो.

मेक्सिकन हॉट फज संड्ए

साहित्य :

व्हीिपग क्रीम- पाऊण कप

ताजी बनवलेली स्ट्राँग कॉफी- अर्धा कप

कमी गोड चॉकलेट चिप्स- ५०० ग्रॅम

दालचिनी पावडर – १ चमचा

व्हॅनिला इसेन्स – अर्धा चमचा

भाजलेले शेंगदाणे, मगज किंवा पाइन नट्स – १ चमचा (सजावटीसाठी)

व्हॅनिला आइसक्रीम – १ स्कूप

कृती :

फज सॉस-क्रीम आणि कॉफी प्रथम नीट मिसळून उकळून घ्या. गॅस बंद करून त्यामध्ये दालचिनी पावडर आणि चॉकोलेट घालून चॉकलेट वितळेपर्यंत हलवून मिश्रण एकजीव करा. नंतर त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स मिसळा.

सìव्हग : एका ग्लासमध्ये व्हॅनिला आइसक्रीम घालून त्यावर साधारण गरम फज सॉस तसंच भाजलेले नट्स घालून सव्‍‌र्ह करा.

मेक्सिकन स्ट्रॉबेरी ग्वाकामोल

साहित्य :

पिकलेले अ‍ॅव्होकॅडो- २ कापून त्यातील गर काढून घ्यावा.

मिरची (अ‍ॅलोपॅनो)- १ बारीक चिरलेली (बिया आणि शिरा काढून)

िलबू- १ रस (२ चमचे) आणि पातळ साल (झेस्ट)

कोिथबीर- ३ टेबलस्पून बारीक चिरलेली

स्ट्रॉबेरी- १२५ ग्रॅम बारीक चिरलेली आणि थोडी लांब गाíनशसाठी

कृती :

अ‍ॅव्होकॅडो एका काचेच्या भांडय़ात मॅशर वापरून जाडसर मॅश करून घ्या.

त्यामध्ये अ‍ॅलोपॅनो (मिरची), िलबाचा रस, झेस्ट, कोिथबीर आणि स्ट्रॉबेरी एकत्र करून नीट मिसळेपर्यंत फोल्ड करा. वर लांब कापलेले स्ट्रॉबेरीचे तुकडे पसरून लगेच सव्‍‌र्ह करा.

टीप : लगेच सव्‍‌र्ह करावयाचे नसल्यास रॅप (६१ंस्र्) ने घट्ट गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवावे. (जास्तीत जास्त ४ तास)

मेक्सिकन मिनी गोíडटास डी नाटा

साहित्य :

कंडेन्स्ड मिल्क- अर्धा कप

नाटा (गार दुधावर जमलेली मलई)- अर्धा कप

मदा- २ कप (साधारण ३०० ग्रॅम)

बेकिंग पावडर- १ टेबलस्पून

कृती :

मदा आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या.

इलेक्ट्रिक मिक्सर किंवा व्हिस्क वापरून मलई आणि कंडेन्स्ड मिल्क नीट एकजीव करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये मदा थोडा थोडा मिसळत राहा आणि छान कणकेसारखा मळून घ्या. जास्त कोरडा होणार नाही याची काळजी घ्या.

नंतर डिस्टग केलेल्या ओटय़ावर किंवा पोळपाटावर साधरण अर्धा इंच जाडीचा थर होईल असे लाटून घ्या. बिस्किट कटरने आपल्या आवडीचे किंवा गोल आकारात कापून घ्या. एका नॉन-स्टिक पॅनमध्ये घेऊन हे काप मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या आणि साधारण कोमट असताना सव्‍‌र्ह करा.

इटालियन इझी कॅपोनाटा

साहित्य :

सेलरीचे देठ – २ साधारण पाव इंचाचे तुकडे केलेले

ऑलिव्ह ऑइल – अर्धा कप

मध्यम आकारचे वांगे – १. बारीक खाता येण्यासारखे काप कापलेले

लाल ढोबळी मिरची – २ बारीक चिरलेली

झुकिनी – २ लहान चौकोनी तुकडे (डाइस्ड) कापलेले

टोमॅटो प्युरी (पसाटा) – १३/४ कप

विनेगर व्हाइट – अर्धा कप

साखर – १ टेबलस्पून

काळी ऑलिव्हज – १० बिया काढलेली

बेदाणे – २ टेबलस्पून

शेंगदाणे, मगज किंवा पाइन नट्स – २ टेबल स्पून

मीठ – चवीप्रमाणे

काळी मिरी पावडर – चवी प्रमाणे

बेसिलची पाने – १० चिरलेली

कृती :

एका मोठय़ा भांडय़ात थोडंसं मीठ घालून पाणी उकळवून त्यात सेलरीचे तुकडे घालून उघडेच साधारण एक मिनीट शिजवा. नंतर लगेच गाळून गार पाण्यात बराच वेळ ठेवून द्या.

एका पॅनमध्ये तेल गरम करून सेलरी साधारण ५ मिनिटे परतून घ्या. नंतर वांगी, ढोबळी मिरची आणि झुकिनी घालून थोडं शिजेपर्यंत परता- साधरण ५ मिनिटे. नंतर टोमॅटो प्युरी, व्हिनेगर आणि साखर घालून भाज्या शिजेपर्यंत शिजवा- साधारण १५ मिनिटे.

नंतर ऑलिव्ह, रेसिन्स आणि नट्स घालून वरून मीठ आणि मिरपूड घालून नीट एकत्र करा आणि गॅस बंद करा. वरतून बेसिलची पानं घाला. गार झाल्यावर सव्‍‌र्ह करा.

इटालियन कोग्रे फ्रिट्टाटा 

एक्स्ट्रा व्हर्जनि ऑलिव्ह ऑइल – ३ टेबल स्पून

पार्सले – १ जुडी पाने आणि देठ वेगवेगळे चिरलेले.

झुकिनी – ३ लांब तुकडे कापलेले

दूध (फुल क्रीम) – १५० मि.लि.

मोझरेला चीज – १ टेबल स्पून (किसलेले)

पाम्रेसान चीज – ३ टेबल स्पून (किसलेले)

पुदिना पाने – ४ बारीक चिरलेली

कृती :

२ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल एका पॅनमध्ये मध्यम आचेवर गरम करा त्यामध्ये पार्सलेचे देठ घालून नीट परतून घ्या. साधरण ५ मिनिटे.

एका भांडय़ामध्ये पार्सलेची पाने, दूध, दोन्ही चीज आणि पुदिन्याची पाने नीट व्हिस्कने एकत्र करून मिसळून घ्या. त्यात मीठ आणि मिरपूड घालून घ्या. नंतर एका मोठय़ा भांडय़ात उरलेले तेल घालून मंद आचेवर गरम करा. दोन्हीही मिश्रणे त्यामध्ये एकत्र करून त्याला वरून निरनिराळ्या ठिकाणी छिद्र  पाडून घ्या. एका ताटलीमध्ये हे उलट पाडून परत उलटय़ा बाजूवर पॅनमध्ये घाला आणि दुसरी बाजूदेखील सेट करून घ्या. गॅस बंद करून ५ ते १० मिनिटे थंड करून सव्‍‌र्ह करा.

इटालियन वांग्याचा पामा

साहित्य :

एक्स्ट्रा व्हर्जनि ऑलिव्ह ऑइल – अर्धा कप

वांगी – ६ मध्यम. अर्धा इंच जाड कापलेली

टोमॅटो प्युरी – २ कप

ऑलिव्ह ऑइल १ टेबल स्पून

ताजी बेसिलची पाने – १ जुडी

मोझरेला चीज – ५०० ग्राम. नीट कोरडे करून स्लाइस केलेले

ओरेगानो – चवीप्रमाणे

पारमेसान चीज – १२५ गॅ्रम किसलेले

मीठ – चवीप्रमाणे

कृती :

१.     साधारण १ इंच व्हर्जनि ऑलिव्ह ऑइल एका कढईमध्ये मध्यम आचेवर गरम करा. वांग्याचे काप टिशू पेपरवर जरा कोरडे करून चांगले सोनेरी-ब्राऊन होइपर्यंत नीट तळून घ्या. टिशू पेपर असलेल्या ताटलीमध्ये काढून ठेवा आणि मीठ चोळून ठेवा.

२.     टोमॅटो सॉस-एका पसरट पॅनमध्ये टोमॅटो प्युरी, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, मीठ आणि थोडी बेसिलची पाने नीट एकत्र करा १० मिनिटे मंद आचेवर गरम करा.

३.     ओव्हन १९० डिग्री सेंटिग्रेडला गरम करून ठेवा.

बेकिंग पॅन ग्रीज करून त्यामध्ये तळलेले वांग्याचे काप पसरून ठेवा. त्याच्यावर टोमॅटो सॉस पसरा. त्यावर मोझरेला चीज, ओरेगॅनो, बेसिलची चिरलेली पाने आणि पारमेसान चीज घाला असेच एकावर एक थर लावा. आणि शेवटी वर ऑलिव्ह ऑइल शिडका.

आधी गरम केलेल्या ओव्हनमध्ये साधरण ४० मिनिटे (सगळे चीज वितळेपर्यंत) बेक करा. थोडा वेळ थांबून कापून सव्‍‌र्ह करा.

कोरियन कोबीचे सूप

साहित्य :

नापा कोबी (साधा कोबीदेखील चालेल)- गड्डा

वेजि ब्रॉथ – ४ कप

सोयाबीन पेस्ट (दाएनजंग) – ४ टेबल स्पून

काळी मिरी – २ टेबल स्पून (आवडी प्रमाणे कमी-जास्त प्रमाणात वापरावी)

कृती :

एका मोठय़ा भांडय़ात ब्रॉथ उकळवून त्यामध्ये सोया पेस्ट घाला. नीट हलवत राहा. पेस्ट जेव्हा नीट विरघळेल आणि उकळायला लागेल तेव्हा त्यामध्ये कोबी घाला. साधरण २० मिनिटेपर्यंत (कोबी नीट शिजेपर्यंत) शिजवा. गॅस बंद करून काळी मिरी घाला.

कोरियन स्वीट अ‍ॅण्ड सोअर मशरूम

साहित्य :

मशरूम – ३ कप पातळ कापलेले

तेल – तळण्यासाठी

बॅटरचे साहित्य :

गव्हाचे पीठ – १ कप

पाणी – बॅटरपुरतं

सॉया सॉस – १ चमचा

काळी मिरी थोडीशी

चिमूटभर मीठ

सॉसचे साहित्य :

पाणी – १ कप

सॉय सॉस – १ टेबल स्पून

बटाटय़ाचे सत्त्व – १ टेबल स्पून

व्हिनेगर – १ ते २ टेबल स्पून (किंवा चव आवडते त्याप्रमाणे)

ब्राऊन (डेमेरारा) साखर – २ ते ४ टेबल स्पून (किंवा गोडी आवडते त्याप्रमाणे)

तिळाचे तेल – १ चमचा

सॉसमधील व्हेजि साहित्य :

गाजर किंवा ढोबळी मिरची – १ चौकोनी तुकडे केलेली

काकडी – १ सोलून बारीक तुकडे करून (डाइस्ड)

अ‍ॅपल किंवा पायनॅपल – १ कप चौकोनी तुकडे केलेले (डाइस्ड)

तिखट ढब्बू मिरची – २ बारीक चिरलेल्या

मोठे मशरूम – ५ बारीक तुकडे केलेले

कृती :

रात्रभर मशरूम पाण्यात बुडवून ठेवा.

सकाळी मशरूम पाण्यातून काढून हाताने घट्ट दाबून सगळे पाणी काढून टाका. रुमालाने नीट पुसून घ्या. हा पदार्थ चांगला होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मशरूमचे पाणी सॉस बनवण्यासाठी ठेवून द्या.

बॅटरचे सर्व साहित्य नीट एकत्र करा. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.

नीट दाबून कोरडे केलेले मशरूम बॅटरमध्ये बुडवून त्यावर बॅटरचे आवरण करा. कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करून त्यामध्ये वरील मशरूम चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. (कोरियन पद्धतीमध्ये एकदा थोडे थंड करून परत एकदा तळतात.) टिशू पेपरवर नीट काढून जास्तीत जास्त तेल टिपून कोरडे करा. जितके जास्त कोरडे आणि कुरकुरीत तितका पदार्थ चविष्ट.

तिळाचे तेल सोडून बाकी सॉसचे सर्व साहित्य नीट एकत्र करा. एक पॅन गरम करून हे सर्व पदार्थ घालून उकळी आणा. मधून मधून ढवळत राहा. उकळी आल्यावर गॅस मंद करून थोडे घट्ट होऊ द्या. नंतर गॅस बंद करा.

त्यामध्ये व्हेजि घालून साधारण ५ सेकंद टॉस करा.

तळलेल्या मशरूमवर हे सॉस घालून भात आणि इतर साइड डिशेस (बंचन) बरोबर सव्‍‌र्ह करा.

जपानी कोशियन

साहित्य :

मूग – २५० ग्रॅम  ९ साखर – २००-२५० ग्रॅम

कृती :

मूग ४-५ कप पाण्यामध्ये घालून ५ मिनिटे उकळा आणि गळून घ्या.

नंतर मूग कुकरमध्ये शिजवून घ्या. मूग बोटांनी सहजपणे दाबता आले पाहिजेत.

कुकरमधील पाण्याचा वापर करून मिक्सरमध्ये एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. नंतर ती गाळून त्याची साले काढून टाका.

गाळलेल्या पेस्टमध्ये साखर मिसळा आणि मध्यम आचेवर साधारण १५ मिनिटे शिजवा.

नीट एकजीव करून त्याला वरती थोडी चकाकी येऊ द्या.

टीप : ही पेस्ट अनेक जपानी गोड पदार्थ, मिठाई वगरेमध्ये एक जिन्नस म्हणून वापरली जाते. स्वीट डिश म्हणूनही खाल्ली जाते.

कोरियन टोफू कानजुंग

साहित्य :

टोफू घट्ट – ५०० ग्रॅम (फ्रीजरमध्ये ठेवून नंतर थॉ केलेला)

कॉर्न स्टार्च – पाऊण कप  ९      ब्रोकोली – १ कप वाफवून चिरलेली

तेल – टोफू तळण्यासाठी गरज लागेल तितके

सॉस :

आले – १ टेबलस्पून बारीक चिरलेले / वाटलेले

लसूण (ऐच्छिक) – १ टेबलस्पून वाटलेला

सॉया सॉस – २ टेबलस्पून ९      व्हिनेगर – १ टेबलस्पून

साखर – ४ टेबल स्पून   ९      पाणी – १ कप

लाल ढोबळी मिरची – १ चमचा बारीक तुकडे केलेली

कॉर्न स्टार्च – १ चमचा २ टेबलस्पून पाण्यामध्ये मिसळलेले.

कृती :

टोफू नीट दाबून कोरडा करून घ्या. त्यासाठी एका बोर्डवर दोन कापडांमध्ये टोफू ठेवा आणि त्यावर चांगले वजन ठेवा- निदान अर्धा तास. फक्त टोफूचे तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्या. नंतर टोफूचे अर्धा किंवा १ इंचाचे तुकडे करून घ्या. एका पिशवीमध्ये टोफूचे तुकडे घालून त्यात कॉर्न स्टार्च घालून नीट हलवा. गरज पडल्यास जास्त स्टार्च वापरा.

एका छोटय़ा पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करून त्यामध्ये टोफू क्रिस्पी होइपर्यंत तळून घ्या.

एका पॅनमध्ये चमचाभर तेलात आले, लसूण आणि लाल ढोबळी मिरची नीट परतून घ्या. त्यामध्ये पाणी आणि साखर घालून उकळून मोठय़ा गॅसवर शिजवून घ्या. त्यानंतर कॉर्न स्टार्च आणि पाणी घाला. सॉस जरूर तेवढा घट्ट होइपर्यंत उकळा. गॅस बंद करून थोडं थंड होऊ द्या. सॉसमध्ये टोफू घालून जरा वरखाली करा. म्हणजे सॉस सगळ्या टोफूला नीट लागेल. वाटल्यास ब्रोकोलीदेखील घाला.

ब्राऊन राइसबरोबर सव्‍‌र्ह करा. वाटल्यास वाफवलेल्या ब्रोकोलीबरोबर वेगळी सव्‍‌र्ह करा.

कोरियन जूमुक-बाप (फिस्ट राइस)

साहित्य :

शिजवलेला ब्राऊन राइस (वरीचे तांदूळदेखील चालतील) – ५ कप

मशरूम -१/८ कप बारीक चिरलेले

मोठे गाजर – १ चौकोनी तुकडे केलेले

ब्रोकोली – १ छोटा गड्डा (इतर कुठल्या भाज्या असल्यास ऐच्छिक)

तेल – भाज्या परतण्यासाठी,

सॉया सॉस – १ टेबल स्पून

िलबाचा रस – २ टेबल स्पून

मीठ आणि मिरपूड – चवीप्रमाणे

साखर -अर्धा ते एक चमचा चवीपुरती

काळे तीळ – १ टेबल स्पून

तिळाचे तेल – २ टेबल स्पून

भाजलेले पापड – थोडे

गाíनशसाठी थोडय़ाशा आळशीच्या बिया (ऐच्छिक)

 

कृती :

मशरूम, ब्रोकोली, गाजर आणि इतर काही भाज्या असल्यास त्यांचे बारीक चौकोनी तुकडे (डाइस्ड) कापून घ्या.

या सर्व भाज्या तेलामध्ये परतायला लागा. त्यामध्ये सॉया सॉस, मीठ आणि मिरपूड घालून भाज्या शिजेपर्यंत हलवत राहा.

एका मोठय़ा भांडय़ात शिजवलेला भात, िलबाचा रस, मीठ आणि साखर हाताने नीट एकत्र करा. नंतर यामध्ये परतलेल्या भाज्या घालून नीट एकत्र करा. गरज असल्यास चवीप्रमाणे मीठ आणि मिरपूड घाला. शेवटी भाजलेले पापड कुस्करून आणि काळे तीळ घालून लाडूच्या आकारामध्ये नीट वळून घ्या. वळताना भात हाताला चिकटू नये म्हणून जर हातात ग्लोव्ह्ज घातले तर बरे पडते. लोणचे, चटणी आणि कोणताही योग्य रस्सा किंवा सांबारबरोबर सव्‍‌र्ह करा.

कोरियन रामेन (कोरियन नूडल सूप)

साहित्य :

नूडल्स – १२५ ग्रॅम

ऑलिव्ह ऑइल – २ चमचे

वाळवलेल्या लाल ढोबळी मिरचीची पावडर (गोचुगारु) – अर्धा चमचा किंवा चवीप्रमाणे कमी-जास्त

वाळवलेले मशरूम – ४ ते ५

पाणी – ४ ते ५ कप

लसूण – २ ते ३ मोठय़ा पाकळ्या वाटलेल्या

गाजरे – १ ते २ छोटी साधारण पाव इंच तुकडे कापलेली

पांढरे बटण मशरूम – ४ ते ५ कापलेले

मीठ – १ चमचा

गरम मसाला – दीड चमचा

लाल ढोबळी मिरची – अर्धा चमचा पेस्ट केलेली

 

कृती :

एका भांडय़ामध्ये १ कप पाण्यामध्ये वाळवलेले मशरूम पुन्हा नीट ओले होइपर्यंत बुडवून ठेवा आणि नंतर उभे कापून बोलमध्ये पुन्हा काढून ठेवा.

एका भांडय़ामध्ये २ चमचे तेल घेऊन मध्यम आचेवर गरम करा आणि त्यामध्ये मिरचीची पावडर घालून थोडी परतून घ्या. त्यामध्ये गरम मसाला, भिजवलेले मशरूम (पाण्यासकट), लसूण, बटण मशरूम आणि गाजर घाला. साधारण साडेचार कप पाणी घालून झाकण ठेवून उकळवा.

नंतर मिरची पेस्ट, मीठ घालून मंद आचेवर ४ ते ४ मिनिटे गरम करा. शेवटी नूडल्स घालून २ ते ३ मिनिटे (नूडल्स शिजेपर्यंत) उकळवा.

गरम गरम सव्‍‌र्ह करा.

जपानी कॉर्न पॉटेज सूप

साहित्य :

लोणी – २ टेबलस्पून

वेजिटेबल ब्रॉथ – ३०० मि.लि.

मदा – १ टेबल स्पून

स्वीट कॉर्न सूप – १ टिन

दूध – १ कप

मीठ – चवीप्रमाणे

पांढरी मिरपूड – चवीप्रमाणे

पार्सले – बारीक चिलेली फक्त गाíनशसाठी

 

कृती :

प्रथम एका पॅनमध्ये लोणी वितळवून त्यात मदा घालून एक मिनीटभर शिजवून घ्या. नंतर व्हेजिटेबल ब्रॉथ घालून उकळेपर्यंत नीट ढवळत राहा. त्यामध्ये टिनमधील सूप घालून पुन्हा उकळा. घट्ट सूप गार करून मिक्सरमध्ये नीट बीट करून गाळून घ्या. एका पॅनमध्ये घालून त्यात दूध घालून गरम करा त्यामध्ये मीठ आणि मिरपूड घाला. वरतून पार्सले घालून गरम गरम सव्‍‌र्ह करा.

जपानी व्हेजिटेबल (रॅप्स) ग्योझा

साहित्य :

कोबी – पाव (२०० ग्रॅम)

मीठ – अर्धा चमचा

मशरूम – ३ मोठे

बांबूचे देठ – २ मोठे चमचे उकडलेले

आले – १ इंच किसलेले

सॉया सॉस – १ टेबल स्पून

बटाटय़ाचं सत्त्व (काटाकुरिको) – १ टेबल स्पून

ब्रेड क्रम्ब्स (पॅन्को) – २ ते ३ टेबल स्पून

तिळाचे तेल – १ टेबलस्पून

राइस रॅप (६१ंस्र्)- जरुरीपुरते

तेल – तळण्यासाठी

सॉस (डीपसाठी) :

सॉया सॉस – ३ टेबलस्पून

तांदळाचे व्हिनेगर – ३ टेबलस्पून

तिळाचे किंवा मिरचीचे (रायु) तेल – १ चमचा

कृती :  कोबी बारीक चिरून त्यावर पाव चमचा मीठ भुरभुरावे आणि चोळावे. ५ मिनिटे तसेच ठेवा नंतर नीट दाबून सर्व पाणी काढून टाका. मशरूम, बांबू शूट बारीक चिरून घ्या.

एका मोठय़ा भांडय़ामध्ये रॅप (६१ंस्र्) आणि तेल सोडून सर्व साहित्य नीट एकत्र करा.

राइस रॅपचे कानोले बनवता येतील इतक्या आकाराचे तुकडे करा. प्रत्येक तुकडय़ामध्ये वरील मिश्रण भरून रॅपच्या कडेला पाणी लावून चिकटवा.

एका कढईमध्ये तेल तापवून वरील ग्योझा सोनेरी होइपर्यंत तळून (डीप फ्राय) घ्या.

बुडवण्यासाठी सॉससाठीचे सर्व साहित्य नीट एकत्र करा.

तळलेले ग्योझा सॉसबरोबर सव्‍‌र्ह करा.

जपानी नापा कॅबेज निबिताशि

साहित्य :

९ नापा कॅबेज (नापा कोबी) किंवा साधा कोबी – ३५०-४०० ग्रॅम

९ टोफू – १ मोठा तुकडा किंवा २ पातळ तळलेले तुकडे (अबुरागे)

९ दही (दाशी) – २४० मि.लि.

९ सॉया सॉस – १ चमचा

९ राइस व्हिनेगर – १ टेबल स्पून

९ मीठ – चवीप्रमाणे

कृती :

नापा कोबी साधारण २ इंच लांबीच्या तुकडय़ात कापून घ्या. टोफू साधारण अर्धा इंचाचे तुकडे करून घ्या.

एका भांडय़ामध्ये दही, सॉया सॉस, व्हिनेगर आणि मीठ घालून उकळवा. त्यात कोबी घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवून घ्या. कोबी शिजल्यावर टोफू घाला आणि थोडा वेळ शिजू द्यावे. झाकण ठेवून गार करा.

First Published on August 3, 2018 1:04 am

Web Title: shravan month of fasting delicious fasting recipes for