vv11‘बँग बँग’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅकमधील कतरिनाच्या स्टाईलिश गाऊन्सवर आतापर्यंत फिदा झाला असाल तर एक गोष्ट नक्कीच नमूद करावी लागेल की या दोन्ही गाऊन्सचा डिझाइनर एक मराठमोळा फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे आहे. या लूक्सबद्दल बोलताना स्वप्नीलने सांगितले, ‘या गाण्यामध्ये आम्हाला मायकल जॅक्सनला श्रद्धांजली वाहायची होती. त्यामुळे ८०च्या दशकातील लूक निश्चित करण्यात आला होता. म्हणून या गाण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट, डिस्को स्टाईलचे गाउन्स तयार करायचे होते. यातला पहिला ब्लॅक अँड व्हाईट गाऊन माझ्या २००९च्या कलेक्शनमधला आहे, तर न्यूड क्रिस्टल गाऊन माझ्या कुटूर कलेक्शनमधील आहे.’