कुठल्याही हॉटेलात जा..
मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला स्टार्टर्स दिसतात. स्टार्टर्सचे लहानांसह मोठय़ांना आकर्षण असते. असेच स्टार्टर्सचे पदार्थ घरच्या घरी केल्यास रोजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच वेगळी होईल.  

क्रिस्पी मेक्सिकन डिस्क
टॉिपगसाठी साहित्य- पनीर तुकडे, चिरलेला पालक, उकडलेला राजमा, ग्रेटेड चीज, चिरलेला कांदा, चिरलेले लसूण, उकडलेले कॉर्न, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार, िलबाचा रस.
डिस्कसाठी साहित्य व कृती- मक्याचे पीठ, मैदा प्रत्येकी ३ वाटय़ा, मीठ चवीनुसार, पाणी आवश्यकतेनुसार.
सर्व साहित्य एकत्र करून त्याचे कणीक मळून त्याच्या छोटय़ा छोटय़ा पुऱ्या लाटून घ्या. पुऱ्या फुगू नयेत म्हणून त्यावर काटय़ा चमच्याने बारीक छिद्र करा. नंतर पापडासारखे कडक तळून घ्या.
सॉससाठी साहित्य व कृती- फेटलेले दही १ वाटी, चिरलेली कोथिंबीर, काळी मिरी पावडर चिमूटभर, मीठ चिमूटभर, ठेचलेला लसूण, दह्य़ामध्ये काळी मिरी पावडर, मीठ, लसूण, कोथिंबीर मिक्स करून घ्या.
कृती-    
१. एका पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यात कांदा, टोमॅटो, लसूण, लाल मिरची पावडर, मीठ व िलबाचा रस, राजमा एकत्र घालून परतवून घ्या.
२. तळून घेतलेल्या कडक पुऱ्यांवर तयार केलेला सॉस लावून घ्या.
३. आता तयार केलेले टॉपिंग त्यावर लावून घ्या. चिरलेला पालक व चीजने गाíनश करून सव्‍‌र्ह करा.

अजवानी पनीर टार्टस्
साहित्य- पनीरचे छोटे क्युबस १ वाटी, हिरवी मिरची १ चमचा, चिरलेली सिमला मिरची २ चमचे, बारीक चिरलेले आले १ चमचा, बारीक चिरलेले लसूण २ चमचे, बारीक चिरलेले टोमॅटो १ चमचा, धणा पावडर, काश्मिरी मिरचीचा क्रश, चिरलेली कोथिंबीर ३ चमचे, गरम मसाला चिमूटभर, कसुरी मेथी १ चमचा, मीठ चवीनुसार, ओवा १ चमचा, काळे मीठ चिमूटभर, ग्रेटेड चीज ३ चमचे, ब्रेड स्लाइस ६ ते ७, टार्टचे मोल्ड ६ ते ७.
कृती- एका पॅनमध्ये तेल टाकून कांदा, हिरवी मिरची, आले, सिमला मिरची, टोमॅटो, गरम मसाला, ओवा, पनीर, कसुरी मेथी, कोथिंबीर काश्मिरी मिरची क्रश, मीठ, काळे मीठ चांगले परतवून त्याचे मिश्रण तयार करा. ब्रेड स्लाइस स्टीम करून घ्या. टॉर्ट मोल्डला थोडे बटर लावून त्यामध्ये ब्रेड स्लाइस ठेवा. त्यामध्ये तयार मिश्रण टाकून गाíनशसाठी ग्रेटेड चीज ठेवा. २० ते २५ मिनिटे १८० डिग्रीवर ब्राऊन होईपर्यंत बेक करा.

कॉर्न पीस चिजी बाइटस्
साहित्य- उकडलेले ठेचून घेतलेले कॉर्न, उकडलेले ठेचून घेतलेले मटार, मदा, बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेले चीज, ब्रेड स्लाइस् ३, दूध, शेवयांचा चुरा, चिरलेले बेसील, मीठ चवीनुसार, हर्बस्, ब्लॅक पेपर पावडर चिमूटभर, तळण्यासाठी तेल.
कृती- २. एका पॅनमध्ये थोडे तेल घालून कांदा, सिमला मिरची, मका, मटार, घालून परतवून घ्या. त्यात मदा घालून पुन्हा नीट परतून घ्या. नंतर त्यात दूध, हर्बस्, बेसील पाने, ब्लॅक पेपर पावडर, चीज टाकून चांगले मिक्स करून परतवून घ्या. थोडे थंड झाल्यावर ब्रेड कुस्करून घाला, त्याचे छोटे छोटे बुलेटस् करून घ्या. तयार बुलेटस्वर शेवयांचे कोटिंग करून डीप फ्राय करून गरमागरम सव्‍‌र्ह करा.

टेस्टी पोटॅटो स्ट्रीक्स्
साहित्य- उकडून स्मॅश केलेले बटाटे २ ते ३, बांबू शासलीक स्टीक्स् ८ ते १०, कॉर्नफ्लॉवर २ ते ३ चमचे, मदा २ चमचे, लिंबाचा रस १ चमचा, बारीक चिरलेला कडीपत्ता १ चमचा, बारीक चिरलेला कांदा २ चमचे, ग्रेटेड जिंजर १ चमचा, चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, सिझनिंग पावडर २ चिमूट, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची १ चमचा
कृती- एका पॅनमध्ये तेल टाकून कांदा, कडीपत्ता हिरवी मिरची, लाल मिरची पावडर ग्रेटेड आले, स्मॅश केलेला बटाटा, कोथिंबीर, िलबाचा रस, सिझनिंग पावडर हे सर्व टाकून परतवून घ्या. थंड झाल्यावर त्यात थोडे कॉर्नफ्लॉवर लावून ते मिश्रण बांबू स्टीकला लावून घ्या.
आता नॉनस्टीक पॅन गरम करून थोडे तेल टाकून तयार स्टीक श्ॉलो फ्राय करून घ्या. स्वीट चिली सॉसबरोबर सव्‍‌र्ह करा.

’ संपादन सहाय्य : प्रभा कुडके ’ डिझाइन : दिनेश राणे, प्रकाश पराडकर