कुठल्याही हॉटेलात जा..
मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला स्टार्टर्स दिसतात. स्टार्टर्सचे लहानांसह मोठय़ांना आकर्षण असते. असेच स्टार्टर्सचे पदार्थ घरच्या घरी केल्यास रोजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच वेगळी होईल.  

सिमला मिर्च मटर टिक्की
साहित्य : उकडलेले बटाटे- ३ नग,  किसलेली सिमला मिरची- १/२ वाटी, चिरलेली सिमला मिरची मिरची- १/२ वाटी, हिरवी मिरची- १ चमचा, कॉर्नफ्लॉवर- २ चमचे, मीठ- चवीनुसार, चिरलेली कोथिंबीर- २ चमचे, तळण्यासाठी तेल. वाफवून ठेचून घेतलेले मटरचे दाणे- १ वाटी, रोस्टेड चणा डाळ पावडर- १-१/२ चमचा, रोस्टेड जिरे पूड १ टी स्पून चाट मसाला- १ टी स्पून, साखर- १ चिमूट.
कृती : उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यामध्ये हिरवी मिरची, मटरचे दाणे, रोस्टेड चणा डाळ पावडर, साखर, चाट मसाला, रोस्टेड जिरेपूड मीठ, कॉर्नफ्लॉवर सिमला मिरची एकत्र मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. आता हे गोळे हातावर थोडे दाबून डीप फ्राय करून घ्या. टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा.

मेथी पनीर टिक्की
साहित्य : उकडलेले बटाटे- २ नग,  बारीक चिरलेली मेथी- १/२ वाटी, किसलेले पनीर- १/२ वाटी,  हिरवी मिरची- १ चमचा, धणा पावडर- १/२ चमचा, गरम मसाला- चिमूटभर, कॉर्नफ्लॉवर- १ चमचा, मीठ- चवीनुसार, तळण्यासाठी तेल. चाट मसाला- १/२ टी स्पून, कसुरी मेथी- १/२ चमचा.
कृती : उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यामध्ये मेथी, पनीर, हिरवी मिरची, मीठ, धणा पावडर, गरम मसाला, चाट मसाला, कसुरी मेथी, कॉर्नफ्लॉवर एकत्र मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. आता हे गोळे हातावर थोडे दाबून डीप फ्राय करून घ्या. चिंचेच्या गोड चटणीबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा.

फ्लॉवर टिक्की
साहित्य : उकडलेले बटाटे- ३ नग, किसलेले फ्लॉवर- २ वाटी, बेसन- २ चमचे, लाल मिरची पावडर- १ चमचा, कॉर्नफ्लॉवर- १ चमचा, धणा पावडर- १/२ चमचा, गरम मसाला- चिमूटभर, मीठ- चवीनुसार, हळद- चिमूटभर, तळण्यासाठी तेल.
कृती :  उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ, कॉर्नफ्लॉवर, फ्लॉवर, गरम मसाला, धणा पावडर, हळद एकत्र मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. आता हे गोळे हातावर थोडे दाबून डीप फ्राय करून घ्या. पुदिना चटणीसोबत गरमा गरम सव्‍‌र्ह करा.
टीप : चेंज म्हणून वरच्या टिक्कीचे मिश्रण बनवून क्रश कॉर्नफ्लेक्समध्ये घोळवून घ्या आणि हाताने दाबून घ्या, नंतर तळा म्हणजे टिक्क्या अजून कुरकुरीत होतील.

बीट टिक्की लाजवाब
साहित्य : उकडलेले बटाटे- ३ नग, किसलेले बीट- १/२ वाटी, हिरवी मिरची- १ चमचा, चाट मसाला- चिमूटभर, धणा पावडर- १/२ चमचा, गरम मसाला- चिमूटभर, कॉर्नफ्लॉवर- २ चमचे, मीठ- चवीनुसार, तळण्यासाठी तेल. रोस्टेड तीळ- ३ चमचे

कृती : उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यामध्ये हिरवी मिरची, रोस्टेड तीळ, मीठ, चाट मसाला, धणापावडर, गरम मसाला, कॉर्नफ्लॉवर किसलेले बीट एकत्र मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. आता हे गोळे हातावर थोडे दाबून डीप फ्राय करून घ्या. टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा.