नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

काही ब्रॅण्ड्सचा उदय हा इतका दिलासा देणारा असतो की,अरे यांना हे जमू शकतं तर आपणही प्रयत्न करून बघावं अशी ऊर्जा त्यातून मिळते. कपडे आणि त्यांचे ब्रॅण्ड म्हणजे अफाट समुद्र आहे आणि अशा समुद्रात स्वत:चं वेगळं बेट तयार करणं जबरदस्त आव्हानात्मक आहे. त्यातही एखादी कंपनी वा समूह हे आव्हान पेलताना बघणं कदाचित फारसं आश्चर्यजनक नसावं पण एक मध्यमवर्गीय गृहिणी जेव्हा हे करते तेव्हा अर्थातच ती हॅट्स ऑफ गोष्ट असते.

Salman Khan house firing incident
Salman Khan Firing Case : पनवेलमध्ये वास्तव्य, वांद्र्यात रेकी आणि पोर्तुगालमधून धमकी, गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा
salman khan first post after firing at home
घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानची पहिली पोस्ट, व्हिडीओ केला शेअर
Rohit Raut stunning performance at Ajay-Atul live concert video viral
Video: अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये रोहित राऊतचा जबरदस्त परफॉर्मन्स, नेटकरी म्हणाले, “क्रिकेटमध्ये रोहित शर्मा अन्…”
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?

दिल्लीत राहणाऱ्या आणि दोन मुलांची आई असलेल्या मध्यमवर्गीय स्त्रीची ही कहाणी आहे. मीना िबद्रा यांना वयाच्या ३९ व्या वर्षी फक्त घर एके घर करत राहण्याचा कंटाळा आला. कपडे, कपडय़ांच्या वेगवेगळ्या फॅशन याविषयी आवड होती. स्वत:च्या कपडय़ांना, अगदी साध्या पंजाबी ड्रेसलाही इतरांपेक्षा वेगळं कसं डिझाइन करता येईल याचा विचार त्या सहजच करत होत्या. फॅशन डिझायिनग वगरे संकल्पना फारशा न रुजलेल्या त्या काळात मीना यांना आपण पंजाबी ड्रेस तयार करून विकण्याचा व्यवसाय करावासा वाटणं हीच खास गोष्ट होती. कारण रेडिमेडपेक्षा विश्वासातल्या टेलरकडून ड्रेस शिवून घेण्याकडे महिलांचा कल असायचा. पण सहज ‘करून तर बघू या’ म्हणत मीना यांनी बँकेकडून ८००० रुपयांचं कर्ज घेतलं. ही रक्कम त्या काळात म्हणजे १९८३ मध्ये निश्चितच मोठी होती. हातात पसे आल्यावर पहिले त्यांनी एक टॅक्सी भाडय़ाने घेतली आणि कापडाचे होलसेल मार्केट गाठले. कापड खरेदी करून टेलरला सूचना देऊन त्यांनी ४० रेडिमेड ड्रेस शिवले. एस, एम आणि एल (S, M, L) अशा साइजमधल्या या ड्रेसची किंमत होती प्रत्येकी १७० रुपये. या ड्रेसची विक्री झाल्यावर आणखी काही नवी डिझाइन्स मीनाजींनी आणली आणि ३००० रुपयांचा नफा कमावला. या यशाने त्यांचा हुरूप वाढला. व्यवस्थित विचारपूर्वक ड्रेस डिझायिनग सुरू झालं. टिपिकल पंजाबी ड्रेसच्या पलीकडे जात त्याला आधुनिकतेची जोड देत मीनाजी काम करत होत्या. फॅशन आणली तरी मूळ सोडायचे नाही हा त्यांचा विचार खूप महत्त्वाचा होता. त्यांच्या डिझाइन्समध्ये भारतातील पारंपरिक पेहरावाचा स्पर्श अशा अनोख्या पद्धतीने येतो की, ड्रेस विकत घेणारीला परंपरा आणि नवता दोन्ही मिळते. दिल्लीतल्या एका सरदारजींकडून त्या काही ड्रेसेस शिवून घ्यायच्या. हे सरदार घेरेवाली सलवार मस्त शिवायचे. सरदारजींचं मूळ गाव पटियाला त्यामुळे मीनाजींनी या घेरेवाल्या सलवारला आपल्या ब्रॅण्डमध्ये ‘पटियाला’ म्हणून स्थान दिलं. याशिवाय पॉकेटवाला हरयाणवी कुर्ता, पेशवाई स्टाइल बाराबंदी कुर्ता, बत्तीस चुण्यांचा बत्तीस कली. समोर चुण्या असणारा भोपाली कुर्ता हे सगळे ड्रेस प्रकार म्हणजे जुन्याला नवा स्पर्श होता. स्त्रिया जेव्हा तो ड्रेस घालतील तेव्हा त्यांना ‘कनेक्टेड’ वाटलं पाहिजे या मीनाजींच्या विचारांचं कौतुक वाटतं.

सुरुवातीच्या काळात बऱ्याच स्त्रियांप्रमाणे मीनाजींनी घरच्या घरी ड्रेस विकले. स्त्रियांना बोलावून ड्रेस ट्राय करायला त्या सांगायच्या. मात्र विकत घेण्याची सक्ती बिलकुल नव्हती. हळूहळू हे ड्रेसेस इतरांपेक्षा वेगळे आहेत, वेगळा लुक देतात याचा प्रचार झाला आणि मीनाजींच्या आयुष्याला टìनग पॉइंट आला. १९८८ मध्ये बेंझर या सुविख्यात शोरूमची मोठी ऑर्डर मीनाजींना मिळाली. मॉल किंवा ब्रॅण्ड शोरूम नसण्याच्या काळात या मागणीचं अप्रूप खूपच मोठं होतं. पण मधल्या पाच वर्षांच्या काळात मीनाजींनी तीन गोष्टींची खूणगाठ मनाशी बांधली होती. एक म्हणजे व्यवसायात कपडय़ांची डिलिव्हरी वेळेवर झालीच पाहिजे. दुसरं म्हणजे बिल बुक अचूक राखलं पाहिजे आणि तिसरं म्हणजे या व्यवसायाचं एक ब्रॅण्डनेम असलं पाहिजे. इथे ‘बिबा’ या ब्रॅण्डचा जन्म झाला. बिबा म्हणजे अस्सल पंजाबी किंवा पंजाबी सोनी कुडी. नावात मातीचा सुगंध, स्त्रीत्व आणि आकर्षकपणाही असेल याचा योग्य विचार इथे झालेला दिसतो.

बेन्झरनंतर शॉपर्स स्टॉप, पँटालून्स वगरे शोरूम्समध्ये ‘बिबा’चा ब्रॅण्ड झळकू लागला. खास प्रसंगापासून ऑफिसवेअपर्यंत उत्तम पर्याय स्त्रियांना मिळू लागला आणि हा ब्रॅण्ड स्थिर झाला. नव्वदच्या काळात इनऑर्बटि मॉल मालाडमध्ये खास बिबा शोरूम उघडलं आणि आज देशभरात बिबाची शोरूम्स जवळपास सगळ्या मॉल्समध्ये आढळतात. हा देशातलाच नाही जगभरातल्या स्त्रियांचा भारतीय पेहरावासाठीचा खास ब्रॅण्ड झाला आहे. चित्रपटसृष्टीलाही ‘बिबा’ची स्टाइल भावली. ताल, यादें, परदेस, ना तुम जानो ना हम, देवदास, हलचल ते अगदी आताचा बजरंगी भाईजान अशा चित्रपटातील नायिकांनी हा ब्रॅण्ड आनंदाने मिरवला. २०१२ मध्ये Most admired Indian Women Brand िहोण्याचा मान बिबाला मिळाला.

रुपये ८००० च्या कर्जावरून सुरू झालेली ही कपडय़ांच्या धाग्याची कहाणी आज ६०० कोटी वार्षकि उलाढालीचे वस्त्र विणतेय. आयुष्यातला एक चमकदार क्षण जो तुम्हाला ऊठा आणि काही करून दाखवा असं सांगत असतो, तो पकडणारे लाखात एकच. मीना िबद्रा या अशाच लाखांतील एक. त्यामुळे मनात एखाद्या व्यवसायाची बीजं रुजत असतील तर त्या बियाणाला मेहनतीचं, सातत्याचं, कल्पकतेचं खतपाणी जरूर घाला. भविष्यात त्याचा वटवृक्ष होणं अटळ आहे याचा दाखला बिबा आणि मीना िबद्रा आपल्याला देतात. त्यामुळे स्वप्नांचा एक एक धागा विणत राहू या. मंडळी आपल्याही ब्रॅण्डचं जरतारी वस्त्र कधीतरी विणलं जाईलच !

viva@expressindia.com