अगदी स्ट्रीट मार्केटपासून, हायएण्ड मॉल्सपर्यंत सगळीकडे नवीन कलेक्शन सजलं आहे. खूप वेगवेगळे ट्रेंडी आऊटफिट्स सध्या बाजारात दिसत आहेत आणि या आऊटफिट्सबरोबरीने त्यावर वापरायचे दागिनेदेखील ट्रेण्डी बनताहेत. ज्वेलरी ट्रेंडी होत आहे. मधला काही काळ कमीत कमी किंवा छोटे- नाजूक दागिने वापरायचा ट्रेण्ड होता. वेस्टर्न आऊटफिट्स आणि फ्यूजन वेअरवर, तर मोठे दागिने अजिबात वापरले जायचे नाहीत; पण गेल्या दीडेक वर्षांपासून अ‍ॅक्सेसरीज म्हणून ज्वेलरी पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावर वापरण्यात येत आहे. ज्वेलरीचे भरपूर वेगवेगळे ट्रेण्ड्स यंदाच्या सीझनमध्ये बघायला मिळत आहेत. मोठमोठे ऑक्सिडाइज्डचे चंकी नेकपीसेस मध्यंतरी ट्रेण्डमध्ये होते. त्यानंतर रंगीबेरंगी खडे किंवा मोत्यांच्या ज्वेलरीने वेगळा ट्रेण्ड सेट केला होता आणि आता कलरफुल अशा गोंडय़ांची ज्वेलरी ट्रेंड-सेटर ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेगवेगळ्या गडद रंगांचे गोंडे दागिन्यांमध्ये वापरले जातात. थोडय़ा मोठय़ा आकाराच्या गोंडय़ांच्या इअररिंग्ज, त्याचबरोबर ब्रेसलेट्स, नेकपीसेस, गोंडेदार चपला सध्या ट्रेंडमध्ये आहेत. या ज्वेलरीचं वैशिष्टय़ म्हणजे फॉर्मल शर्टवरही गोंडय़ांची ज्वेलरी खूप क्लासी दिसते. याखेरीज कुर्तीज, पलाझो पँट्स, डंगरी, स्कर्ट्स, साडी किंवा अगदी अनारकली अशा वेगळ्या प्रकारच्या एथनिक किंवा इंडो वेस्टर्न आऊटफिट्स व ही गोंडेदार ज्वेलरी खूप उठून दिसते.

ज्वेलरीबरोबरीनेच गोंडे जडवलेल्या कुर्तीज, ओढण्या, स्कार्फ असे आऊटफिट्ससुद्धा खूप ट्रेण्डी दिसतात. गोंडे हा अ‍ॅक्सेसरीजचा महत्त्वाचा भाग झाला आहे.

गोंडेदार ज्वेलरी वापरण्याच्या काही टिप्स :

  • फॉर्मल शर्टबरोबर गोंडेदार नेकपीस वापरायचा असेल तर गोंडय़ांचा रंग पेस्टल किंवा फिका निवडा. कॉलरच्या मागून हा नेकपीस घाला आणि शर्टचे कॉलर बटणसुद्धा लावा. यामुळे ट्रेण्डी तरीही फॉर्मल लुक मिळेल. इअररिंग्ज घेणार असाल तर त्याचा आकार लहान असू द्यावा.
  • एका वेळी गोंडेदार इअररिंग्ज किंवा नेकपीस यातली एकच अ‍ॅक्सेसरी आऊटफिटवर वापरा.
  • एखाद्या आऊटफिटवर इअररिंग्ज घालणार असाल तर मॅचिंग गोंडय़ाऐवजी गोंडय़ांचा रंग कॉन्ट्रास्ट असू द्यावा. खूप उठावदार आणि क्लासी लुक मिळेल.
  • हँडवर्क केलेली गोंडेदार ओढणी वापरणार असाल तर प्लेन कुर्ती घाला, जेणेकरून ती ओढणी उठून दिसेल.
  • गोंडेदार चपला कोणत्याही आऊटफिटवर उठून दिसतील. बॉटम्स म्हणजे (स्कर्ट, ड्रेस जीन्स, लेगिंग्ज काहीही) शक्यतो अँकल लेन्थ असू द्यावे.त्यावर गोंडेदार चपल्स जास्त उठून दिसतील.

अनेक फॅशन डिझायनर्स गोंडय़ाचा वापर डिझाइन्सपमध्ये करताना दिसताहेत. एका रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्ये परीक्षक असलेली शिल्पा शेट्टी अनेकदा गोंडय़ांच्या इअरिंग्ज वापरताना दिसली आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bunchy jewellery trendy jewellery
First published on: 03-03-2017 at 00:36 IST