मुक्त, स्वच्छंदपणे आपल्या मनाला येईल तसे फिरसा यावे या हेतून अनेक जण हल्ली सोलो ट्रॅव्हलर्स बनले आहेत. अनेक जणांना आखीव- रेखीव प्रवास करायला आवडत नाही. त्यात थ्रिल नाही, असं वाटतं. अनप्लॅन्ड जर्नी एक्सायटिंग वाटत असली, तरी एकटय़ाने प्रवास करताना शक्यतो बेसिक प्लॅन आणि त्यानुसार सोयी केलेल्या असाव्यात. विशेषत पूर्वी कधीही न गेलेल्या प्रांतात, देशात जाणार असलात तर जाण्या- येण्याच्या तिकीटासह, राहण्याची आगाऊ सोय करणं हेच हिताचं असतं. याशिवाय काही सोप्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  1. जसा देश तसा वेष :  तुमचा नेहमीचा/आवडीचा/सोयीचा पेहराव कसाही असला तरी, तुम्ही जात असलेल्या प्रांतात ज्या पद्धतीचा पेहराव असतो, तसाच घालायचा प्रयत्न करा. आपल्या देशातील ग्रामीण भागात फिरताना तिथली संस्कृती लक्षात घेऊनच पेहराव असावा. अगदी साडी नाही तरी शॉर्ट्स घालणं नक्की टाळता येईल. तेच युरोपात पंजाबी सूटचा आग्रह धरून चालणार नाही.
  2. कॅमेरा, मोबाईल सांभाळा : देशा- विदेशातील टूरिस्ट डेस्टिनेशन्स किंवा गजबजलेल्या ठिकाणी चोरी-मारीचा धोका असतो. एकटय़ाने प्रवास करताना फोटो काढण्यासाठी म्हणून कॅमेरा अनोळखी व्यक्तीकडे सोपवण्याचा हमखास मोह होतो. तरीही उत्साहाच्या भरात सतत वेगवेगळ्या व्यक्तींच्या हाती कॅमेरा किंवा मोबाईल देण्याचं टाळा. युरोपातील काही पर्यटकप्रिय शहरं तर अशा मोबाईल चोरांसाठी जास्त प्रसिद्ध आहेत.
  3. अनोळखी व्यक्तीवर अतिविश्वास नको : आपली पैशाची बॅग, पासपोर्ट असलेले पाकीट कायम स्वतजवळ बाळगणं आवश्यक आहे. हॉस्टेल्स किंवा कम्युनिटी स्टे सारख्या ठिकाणी सामान खोलीवर ठेवलं तरीही छोटी पर्स यासाठी कायम जवळ ठेवा. सामानावर लक्ष ठेवतो असं सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर अतिविश्वास नको.
  4. इमर्जन्सी नंबर : आपण आपल्या मोबाईल आणि इतर गॅजेट्सवर नको इतके अवलंबून असतो. एकटे फिरत असताना मोबाईल हरवला तर कुणा आप्ताचा संपर्कक्रमांकदेखील आपल्याला आठवत नाही. इमर्जन्सी नंबर लिहिलेली डायरी, कागद जवळ ठेवा. कितीही गॅजेटप्रेमी असलात तरी, असा कागद अवश्य ठेवा.
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to prepare for individual journey
First published on: 18-11-2016 at 01:10 IST