ट्रेण्ड्स येतात आणि जातात. पण कपाटातील काही महत्त्वाच्या कपडय़ांचं स्थान कधीच कमी होत नाही. एरवी रोज रोज तेच कपडे घालायचा कंटाळा  येतो, पण अडीअडचणीला मात्र हेच कपडे धावून येतात. याच बेसिक कपडय़ांची आज आठवण काढायचं कारण म्हणजे यंदाचा लेटेस्ट ट्रेण्ड जाणून घेण्याआधी हे कपडे तुमच्या कपाटात आहेत की नाहीत याची उजळणी पहिल्यांदा करून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाळेच्या पहिल्या दिवशी पाटीवर गिरवलेल्या बाराखडीची आठवण कोणी कधीच विसरत नाही. ‘क’ कमळाचा, ‘स’ सशाचाचं बोबडय़ा आवाजात पाठांतर करणाऱ्या चिमुरडय़ांच्या आवाजाने अख्खा वर्ग दुमदुमून जातो. पुढे आयुष्यात आपण मोठमोठे शब्द बोलायला, लिहायला शिकतो आणि बाराखडीचं पाठांतर मागे पडतं. पण अचानक कोणी तरी फोनवर बोलताना आपलं नाव चुकीचं उच्चारतो आणि ‘ण’ बाणातला, नळातला नाही, हे समजावून सांगताना त्या बाराखडीच्या सरावाची आठवण येते. अशी ही बाराखडी प्रत्येक क्षेत्रात असते. जेवण बनवायला शिकण्यापूर्वी पाणी कसं तापवायचं, भात कसा शिजवायचा, चपात्या गोल कशा लाटायच्या इथपासून सुरुवात केली जाते. प्रत्यक्षात वाहतुकीचे नियम पाळणं, हा ज्याचा-त्याचा प्रश्न असला तरी गाडी चालवायला शिकवताना पहिल्यांदा हे नियम शिकवले जातात. दैनंदिन जीवनातील वर्तणुकीपासून ऑफिसमधील कामापर्यंत प्रत्येक बाबतीत नियम महत्त्वाचे असतात. त्यांचा आधार घेत पुढचं काम केलं जातं. कपडय़ांच्या बाबतीतसुद्धा तेच आहे. अगदी स्टायलिंग करायचं म्हटलं तरी पहिले मूळ नियम तुम्हाला ठाऊक आहेत की नाहीत, हे महत्त्वाचं असतं. त्यात कसे आणि किती बदल करावे हे प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे. आज या फॅशनच्या बाराखडीबद्दल बोलायचं कारण म्हणजे तुमच्या कपाटात या बाराखडीतील किती कपडे आहेत याची उजळणी करायची आणि नसल्यास सगळ्यात आधी खांद्यावर पर्स मारून शॉपिंगला निघायची तयारी करायची. कारण यंदाच्या सीझनमध्ये तुमच्याकडे लेटेस्ट ट्रेण्डचे कपडे नसतील, तरी एक वेळ निभावून नेता येईल पण बेसिक लुक नसेल तर मात्र तुमची पंचाईत होऊ  शकते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeans fashion mens jeans fashion women jeans fashion
First published on: 04-08-2017 at 03:10 IST