पाच पांढरे पदार्थ असे आहेत, जे आपल्या रोजच्या जेवणात हमखास असतात. पण त्यांचं अतिसेवन आरोग्याला हानिकारक असतं. कोणते आहेत हे पांढरे पाच आणि त्याला पर्याय कोणते?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिफाइण्ड टेबल सॉल्ट – एक खारट सत्य
नैसर्गिकरीत्या समुद्रातून काढलं जाणाऱ्या मिठात ८४ घटक सामावलेले असतात. ते शरीराला आवश्यक असतात आणि त्यांचे प्रमाण नैसर्गिकदृष्टय़ा योग्य असते. पण आजकाल बाजारात जे रिफाइण्ड टेबल सॉल्ट मिळतं ते ब्लीच करून चकचकीत केलेलं असतं. त्यामुळे त्यातील सगळी नैसर्गिक खनिजद्रव्ये संपुष्टात येतात. आपल्या शरीराला आवश्यकता असते सेंद्रिय स्वरूपातील सोडियमची. टेबल सॉल्टमध्ये सोडियम क्लोराइड स्वरूपात असतं जे शरीरासाठी विषारी मानलं गेलंय. सोडियमच्या अतिरेकी सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात आणि किडनीच्या आजारांचीही शक्यता वाढते. उच्च रक्तदाब हल्ली तरुण वयातही होतो.
सोडियमचा वापर कमी कसा कराल? – गरजेपुरतेच मीठ वापरा.
– फळे खाताना किंवा त्यांचं सरबत करून पिताना प्रत्येक वेळी त्यावर मीठ टाकू नका.
– प्रोसेस्ड फूड म्हणजे- वेफर्स, पॅकबंद रेडीमेड सूप्स, रेडी टू इट किंवा रेडी टू कूक पदार्थ, चीज यांचा वापर कमी करा.
– हॉटेलमध्ये जेवायला गेल्यास पदार्थावर अतिरिक्त मीठ टाकू नये असे वेटरला आधीच सांगा आणि तुम्हीसुद्धा बाहेर जेवताना वरून मीठ टाकू नका

More Stories onडाएटDiet
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjana motwani talk about healthy diet
First published on: 30-10-2015 at 01:28 IST