गेल्या शुक्रवारी वसुंधरा दिन साजरा झाला. पर्यावरणपूरक जीवनशैली ही आजची गरज असल्याचं वेगवेगळ्या माध्यमातून सांगण्यात आलं. पण वेगवान जीवनशैलीच्या जमान्यात जुन्याकडे पुन्हा वळून बघण्यासाठी वेळ आहे कुणाला? प्रत्येक वस्तूचा पूरेपूर वापर करण्याची भारतीयांची सवय आता आपल्याकडेच ‘पुराने जमाने की’ मानली जाते आणि ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’मानसिकता नवी म्हणून आपलीशी करावीशी वाटते. पण ही मानसिकता चिरकाल टिकणारी नाही. ती आपण पाश्चिमात्यांकडून घेतली आणि आता तिथेच ती संकल्पना टाकाऊ बनतेय. सध्या तिथे दबदबा वाढतोय- ‘अपसायकलिंग’चा. रिसायकलिंगसोबत अपसायकलिंग ही संकल्पना आता जगात सगळीकडे आपलीशी केली जाऊ लागली आहे. अपसायकलिंग म्हणजे आपलं ‘टाकाऊतून टिकाऊ’. जुन्या वस्तू, कपडे फेकून देण्याऐवजी त्यापासून कलात्मक आणि उपयुक्त काही बनवण्याची युक्ती. अपसायकलिंग हा रिसायकलिंगचा कलात्मक अवतार. म्हणजे नुसताच पुनर्वापर नाही, तर वापरलेल्या वस्तूपासून सौंदर्यपूर्ण आणि नवी कलाकृती निर्माण करायची. हे पर्यावरणपूरक कलात्मक काम करणाऱ्या काही तरुण कलावंतांची आणि त्यांच्या कलाकृतींची ओळख ही ओळख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्लास्टिकच्या पिशव्या निसर्गासाठी खूपच हानिकारक आहेत. हे माहीत असूनही आपली प्लास्टिक पिशव्या वापरण्याची सवय जात नाही. वापर करून झाला की, पिशव्या तिथेच टाकण्याची सवय काही लोकांमध्ये असते. त्याच प्लास्टिक पिशव्या गोळा करून त्यातून रोजच्या वापरात टिकतील अशा, पुनर्वापर करण्यायोग्य सुंदर पिशव्या करण्याचं काम अमिता देशपांडे ‘आरोहना सोशन डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या माध्यमातून करते.

More Stories onविवाViva
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Useful products from waste
First published on: 29-04-2016 at 01:16 IST