वेदवती चिपळूणकर परांजपे

व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याच्या पद्धती आता काळानुसार झपाटय़ाने बदलत चालल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव असलेल्या या युगात प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतींवर अजून फार प्रभाव पडला नसला तरी काही तरी भन्नाट, इतरांपेक्षा वेगळं करण्याची तरुण पिढीची इच्छा असते आणि या तरुणाईला हटके काय आवडू शकतं हे जोखून सध्या तसे पर्याय उपलब्ध करून देणारे ‘उद्योगी’ही सज्ज आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

‘सागर किनारे दिल ये पुकारे’वाल्या बीच डेट्स किंवा ‘एक गरम चाय की प्याली हो, कोई उसे पिलानेवाली हो’वाल्या कॅफे डेट्स किंवा अगदी गेला बाजार ‘दिया और बाती’वाल्या स्टाइलमधील कॅण्डल लाइट डिनर असो.. अशा सगळय़ा व्हॅलेंटाइन डेच्या सेलिब्रेशन्समध्ये आता तोचतोचपणा यायला लागलाय असं आताच्या नवतरुणाईला वाटतं. त्यामुळे ते व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याच्या नवनवीन पद्धती शोधून काढत असतात. या वर्षीचा व्हॅलेंटाइन नेहमीपेक्षा काही तरी वेगळा लक्षात राहील अशा पद्धतीने साजरा करायचा असेल तर अनेक इंटरेिस्टग पर्याय तयार झाले आहेत.

व्हॅलेंटाइन डेला दोघांनीच कुठे तरी जाणं ही जुनी पद्धत आहे. मात्र त्या ‘कुठे तरी’ जायच्या जागा आणि वेळा हळूहळू बदललेल्या दिसतात. दिवसभर तर सोडाच, पण दिवसाच्या वेळात भेटायलासुद्धा ज्यांना वेळ होत नाही अशा कपल्ससाठी ‘कपल्स ओव्हरनाइट कॅिम्पग’ किंवा ‘व्हॅलेंटाइन स्पेशल स्टेकेशन’ ही संकल्पना सध्या इव्हेंट्समध्ये नव्याने ट्रेण्ड होताना दिसते आहे. गुलाबी थंडीच्या दिवसांत कपल्स कॅिम्पग ही साहजिकच अत्यंत रोमॅंटिक कल्पना आहे. स्टेकेशन म्हणजे काय हे आता नव्याने सांगायला नको. मात्र या वर्षीचा व्हॅलेंटाइन डे हा आठवडय़ाच्या बरोबर मधल्या वारी आल्याने कपल्सना कदाचित व्हॅलेंटाइन स्पेशल वर्केशनसुद्धा करावं लागेल. हे लक्षात घेऊनच व्हॅलेंटाइन स्पेशल स्टेकेशन आणि वर्केशनचेही तुम्हाला सहज भावतील असे पर्याय सध्या उपलब्ध आहेत.

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना गुलाब देणं, समुद्रकिनारी बसून गप्पा मारणं किंवा मंद म्युझिक असलेल्या कॅफेमध्ये एकमेकांच्या डोळय़ात डोळे घालून बघत बसणं वगैरे करणं या आता जुन्या, आऊटडेटेड पद्धती म्हणून इतिहासजमा होऊ पाहात आहेत. आताच्या नवतरुणाईला काही तरी अधिक ‘प्रॉडक्टिव्ह’ करण्यात जास्त रस आहे. त्यामुळे कपल्स स्पेशल डान्स वर्कशॉप, पॉटरी वर्कशॉप, आर्ट वर्कशॉप, कुकिंग वर्कशॉप अशा अनेक वर्कशॉपना एकत्रित हजेरी लावण्यासाठी कपल्स उत्साही असतात. एकमेकांच्या सोबतीने नवीन गोष्टी शिकणं, एकमेकांना त्यात मदत करणं, एकमेकांना प्रोत्साहन देणं, शिकवणं आणि हे सगळं करूनही काहीही शिकणं जमलं नाही तरीही एकमेकांसोबत ‘क्वॉलिटी टाइम’ घालवणं हा त्यातला मुख्य उद्देश नक्की सफल होतो. अशी कोणतीही अ‍ॅक्टिव्हिटी दोघांपैकी एकाला जरी आवडणारी असली, तरी ज्याला ते करायला आवडतं त्याला आवडीची गोष्ट पार्टनरसोबत करता आली म्हणून आणि ज्याला आवडत नाही त्याला आपण आपल्या पार्टनरच्या आनंदासाठी काही तरी मनापासून प्रयत्न केले म्हणून ते करण्याचा आनंद मिळतो. आणि अशा पद्धतीने दोघांचाही प्रेमाचा दिवस सार्थकी लागतो.

दोघांच्याही आवडीनिवडी सारख्या असतील तर अनेक नवनवीन अ‍ॅक्टिव्हिटीज दोघांना एकत्र करता येऊ शकतात. काही कपल्स व्हॅलेंटाइन डेला बुकशॉपमध्ये जातात. पेट्सची आवड असेल तर दोघांच्याही पेट्सना एकत्र ग्रूिमगला नेणं, एकत्र वॉकला नेणं, पेट कॅफेमध्ये जाणं अशा गोष्टी कपल्स एकत्र करू शकतात. वर्कआउट करण्याची आवड असेल तर कपल्स स्पेशल वर्कआउट सेशन्सचा अनुभवही घेऊ शकतात किंवा कपल्स योगाचे सेशन्स घेता येऊ शकतात. शॉपिंगची आवड असेल तर अगदी घरगुती वस्तूंच्या शॉपिंगपासून ते कपडय़ाच्या शॉपिंगपर्यंत कोणतंही शॉपिंग एकत्र करू शकतात. मूव्ही लव्हर्स असतील तर कपल्स सोफा बुक करून थिएटरमध्ये मूव्ही बघू शकतात. ओपन एअर थिएटरचे अनेक इव्हेंट्स अनेक शहरांमध्ये आयोजित झालेले आहेत, त्याचाही अनुभव जोडीने घेता येऊ शकतो. किंवा अगदी या सगळय़ाचाही कंटाळा आला तर ओटीटीवरील वेब सीरिज आणि मूव्ही पाहण्यासाठी बिंज वॉच हा पर्याय कायम खुला आहेच !

ज्या कपल्सना फार घराबाहेर पडून काही करण्याची इच्छा नाही किंवा फारसं आवडत नाही. काहींना दिवसभराच्या कामाच्या धावपळीनंतर असं वेगळं काही करणं वा त्यासाठी प्रत्यक्ष बाहेर जाण्याइतका उत्साह मनात उरत नाही,  त्यांच्यासाठी घरच्या घरी करता येण्यासारख्या अनेक अ‍ॅक्टिव्हिटीज आहेत. एकत्र एखादी स्पेशल डिश बनवणं, एकत्र पेंटिंग करणं, घराचं डेकोरेशन बदलणं, घरच्या घरी एकमेकांचं फेशिअल करणं, स्पा करणं अशा स्वत:ची आणि आपल्या पार्टनरची काळजी घेण्याच्या आणि आवड जपण्याच्या अनेक गोष्टी घरी बसूनही एकत्र करता येऊ शकतात.

काळ कोणताही असो, पिढी कोणतीही असो, व्हॅलेंटाइन डेच्या मागची भावना ही सेमच असते. आपल्या पार्टनरला आवडेल असं काही तरी करणं आणि दोघांनाही एकमेकांकडे लक्ष देता येणं हा त्या दिवसाचा उद्देश असतो. त्यातही एकत्रित काही अ‍ॅक्टिव्हिटी करताना दोघांनाही त्यातून मनापासून आनंद मिळाला, एकमेकांसाठी काही तरी अर्थपूर्ण करता आल्याचं समाधान मिळालं पाहिजे, हाच या सगळय़ा व्हॅलेंटाइन डेच्या खटाटोपांमागचा मुख्य उद्देश असतो. हा उद्देश साध्य करण्यासाठीचे प्रत्येक पिढीचे मार्ग वेगवेगळे असतील, पण आपल्या जोडीदाराबद्दलची ओढ आणि त्याच्यावर असलेलं नितांतसुंदर प्रेम मात्र गहिरं आहे आणि ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’  या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितेच्या जुन्याच ओळी नव्याने गुणगुणायला लावणारं आहे.

viva@expressindia.com

Story img Loader