कुठल्याही हॉटेलात जा.. मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला स्टार्टर्स दिसतात. स्टार्टर्सचे लहानांसह मोठय़ांना आकर्षण असते. असेच स्टार्टर्सचे पदार्थ घरच्या घरी केल्यास रोजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच वेगळी होईल.  

व्हेजिटेबल चिज अ‍ॅण्ड बेसील कटलेट विथ कॉकटेल सॉस
कटलेटसाठी साहित्य : उकडलेले बटाटे – ३ ते ४, कॉलीफ्लॉवर – २०० ग्रॅम, गाजर – २०० ग्रॅम, फरसबी – २०० ग्रॅम,
तुळशीची पाने – २०० ग्रॅम,  बारीक चिरलेले लसूण, बारीक चिरलेला कांदा, मीठ, काळेमिरे, मदा, ब्रेडचे तुकडे, तेल
कॉकटेल सॉससाठी साहित्य : मेयोनीज – १ वाटी, टोबॅस्को सॉस – १० ग्रॅम, टोमॅटो केचप
कृती : बटाटे सोलून उकडवून घ्यावे. थंड झाल्यावर बारीक चुरून घ्यावे. तशाच प्रकारे गाजर, फरसबी आणि फ्लॉवर धुऊन घ्यावे व बारीक चिरावे. एका पॅनमध्ये तेल टाकून गरम करावे. गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा, लसूण व भाज्या घालाव्यात व त्यांना चांगले परतून घ्यावे. भाज्या शिजत आल्यावर त्यामध्ये मीठ व मीरपूड घालून चांगले शिजवून घ्यावे. थंड होण्याकरता एका ताटामध्ये काढावे. बारीक कुस्करलेले बटाटे, भाज्यांचे मिश्रण आणि ३ चमचे मदा एकत्र करावे. त्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकावे. मिश्रण एकत्र करून घ्यावे. मिश्रण थोडेसे घट्ट ठेवावे; जेणेकरून ते तेलात टाकल्यावर फाटणार नाही. या मिश्रणाचे गोळे करून घ्यावेत. दाबून आत चीज भरावे व हार्टशेपचा आकार द्यावा. एका पातेल्यात मदा आणी पाणी घालून मिश्रण बनवायचे, त्यामध्ये हे कटलेट टाका व मग ब्रेडक्रम्स मध्ये घोळून घ्या. हे कटलेट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करावेत.
कॉकटेल सॉसची कृती : मेयोनीजमध्ये टोबॅस्को आणि टोमॅटो केचप घालून मिक्स करावे.
सजावटीकरिता : तुळशीच्या पानाचे (बेसील लीफ) लांब चिरून घ्यावीत. धुऊन पुसून फ्राय करून घ्यावी व सजवावी. चीज बारीक किसून घालावे.     

काजू मटर बोंडा
साहित्य :  हिरवे मटर – २० ग्रॅम, काजू, ब्रेड, हिरवी मिरची, चिंच, गूळ , जिरे, बडीसोप, धणे, मेथी दाणे, मिरची पावडर, चाट मसाला, मीठ , साखर, तूप – २ टीस्पून, बेसन – २ वाटी.
कृती : प्रथम कढई गॅसवर ठेवून त्याला चालू करावे. कढईमध्ये २ चमचे तूप घालावे. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे, बडीसोफ, धणे, व मेथी दाणे टाकावेत. ते चांगले हलवून घ्यावे. त्यामध्ये हिरवे मटर टाकावेत. मटर चांगले शिजू द्यावेत. त्यामध्ये आता काजू व हिरवी मिरची टाकावी. मिश्रण कढई सोडू लागल्यवर त्यामध्ये मिरची पावडर, मीठ, चाट मसाला व साखर घालावी. मिश्रण चांगले एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये चिंच गुळाचे पाणी टाकावे. आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढावे. ब्रेडच्या कडा काढून घ्याव्यात. नंतर त्याला बारीक करून मिश्रणामध्ये घालून ते एकजीव करावे. हे मिश्रण थंड होऊ द्यावे. एका बाऊलमध्ये बेसन घ्यावे. त्यामध्ये तेल व थोडे मीठ घालावे. नंतर त्यामध्ये थोडे पाणी घालून त्याला एकजीव करावे. हे मिश्रण थोडे पातळ ठेवावे. एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवावे. थंड झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करावेत. गोळे जास्त मोठे नसावेत. हे गोळे तेलामध्ये तळून घ्यावेत. गोळे थोडे लालसर तळावेत. हा मेथी बोंडा आपण टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकतो.

शेजवान नुडल्स स्प्रिंग रोल
साहित्य :  उकडलेले नुडल्स – २ वाटी, पत्ताकोबी – १ वाटी (लांब चिरलेली), रंगीत ढोबळी मिरची, कांदा – २५ ग्रॅम, कांदा पात, गाजर, चिरलेले आलं, चिरलेले लसूण, तेल, सीझिनग क्युब – १, साखर, मीठ – चवी पुरते, व्हाइट पेपर, शेजवान सॉस – ३ चमचे.
िस्प्रगरोल्सचे साहित्य : मदा – १ बाऊल, कॉनफ्लॉवर, -१ बाऊल, पाणी – १५०’, अंडं – १ नग.
शेजवान सॉसचे साहित्य :– चिरलेले आले, चिरलेला लसूण, चिरलेला कांदा, चिरलेली सेलरी, तेल – ५०, रेड चिली पेस्ट – २ चमचे, टोमॅटो केचप – १ चमचा, रेड चिली सॉस – १ चमचा, सीझिनग क्युब, साखर, मीठ, पेपर पावडर – चवीनुसार.
िस्प्रगरोलची कृती : मदा, कॉनफ्लॉवर, पाणी, अंडं एकत्र करून त्याचे पातळ मिश्रण बनवून घ्यावे. गॅसवर नॉनस्टीक पॅन गरम करायला ठेवा. मोठय़ा पळीने मिश्रण घेऊन नॉनस्टीक पॅनवर डोश्याप्रमाणे टाका व पातळ पॅनकेक बनवून घ्या. असे पातळ पॅनकेक बनवून ठेवावे.
शेजवान सॉसची कृती : एका कढईमध्ये तेल टाकून त्यला गरम करावे. त्यामध्ये आले, लसूण व कांदा घालून चांगल परतून घ्यावे. त्यामध्ये आता चिली पेस्ट टाकावी. चिली पेस्ट चांगली परतून घ्यावी. नंतर त्यामध्ये टोमॅटो केचप रेड चिली सॉस घालून त्याला चांगले परतून घ्यावे. आता त्यामध्ये सिझिनग क्युब, साखर व मीठ घालून त्याला चांगले एकत्र करावे. मिश्रण तेल सोडू लागल्यावर ते पूर्ण तयार झाले असे समजावे.
शेजवान नुडल्सची कृती : एका कढईमध्ये तेल घालून तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर प्रथम त्यामध्ये चिरलेलं आलं आणि लसूण घालावे व चांगले परतावे. नंतर त्यात कांदा घालावा. कांदा परतल्यावर त्यात सगळ्या भाज्या घालाव्यात व त्या एकत्र करून घ्याव्यात. आत त्यामध्ये नुडल्स घालून ते एकत्र करून घ्यावेत. सगळ्या भाज्या शिजल्यावर त्यात मीठ, साखर व ३ चमचे शेजवान सॉस घालून मिश्रण थंड करावे. आता तयार पॅनकेक (स्प्रिंगरोल्सचे आवरण) मध्ये शेजवान नुडल्स चं मिश्रण घालून त्याचे गोल रोल्स करावेत. हे रोल व्यवस्थित चिकटण्यासाठी मद्यामध्ये थोडे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी व रोल्सला आतून लावावे. आता हे रोल्स तेलामध्ये तळावेत. नंतर हे रोल गोलाकार कापून घ्यावेत.

चटपटे छोले अनारदाना टार्टस्
साहित्य :  छोले – १०० ग्रॅम, तूप – २ चमचे, बारीक चिरलेली मिरची – १ चमचा, कांदा, टोमॅटो, जीरे, बडीसोप, मिरची पावडर, चाट मसाला, लिंबूरस, हळद , मीठ – चवीनुसार, बारीक चिरलेली कोथींबीर – सजावटीकरिता डािळब.    
टार्टस्साठी साहित्य :  मदा – १ वाटी, अजवाईन, जीरा पावडर, मीठ , तूप.
कृती : टार्ट बनवण्याकरिता मद्यामध्ये डालडा, अजवाईन, जीरा पावडर घालून त्यामध्ये थोडे पाणी घालून कणीक मळून घ्यावी. या मिश्रणाचे छोटे गोळे करून,  छोटय़ा वाटीमध्ये हलके तूप लावून ते मिश्रण बारीक पुरीसारखे लाटून वाटीमध्ये घालावे. ओवन तापमान १८० से. ठेवावे. ओवन गरम झाल्यावर हे मिश्रण दहा मिनिटांकरिता बेक करावे. थंड झाल्यावर त्याला वाटीमधून काढून हलके तूप लावून घ्यावे.
छोले मसाला कृती : काबुली चणा शिजवून घ्यावा. चणा शिजल्यानंतर त्याला थंड होऊ द्यावे. कढईमध्ये तूप टाकून गॅस चालू करावा. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची, जिरे, बडीसोफ घालून चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये काबुली चणा घालावा. चणा चांगला परतवून झाल्यावर त्यामध्ये मिरची पावडर, मीठ, चाट मसाला घालावा. मिश्रण चांगले परतवून घ्यायचे. शेवटी त्यामध्ये िलबुरस, डािळब व कोथींबीर घालून ते मिश्रण एकजीव करावे. हे मिश्रण थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढावे.
आधी बनवलेल्या टार्टमध्ये हे मिश्रण घालावे. सटावटीसाठी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व कोथींबीर घालावी. थोडे डािळब सजावटीकरिता घालावे.