News Flash

इंडिका मोटारीच्या जबरदस्त धडकेने रिक्षा उलटून लहानग्याचा मृत्यू

इंडिका मोटारीची जबरदस्त धडक बसल्याने रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात रिक्षातून प्रवास करणारा हर्षवर्धन कुंभार (६) हा लहान मुलगा मरण पावला. हा अपघात भांडुप येथील

| April 16, 2013 12:06 pm

इंडिका मोटारीची जबरदस्त धडक बसल्याने रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात रिक्षातून प्रवास करणारा हर्षवर्धन कुंभार (६) हा लहान मुलगा मरण पावला. हा अपघात भांडुप येथील गुरुनानक शाळेजवळच्या रस्त्यावर घडला.
रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अशोक कुंभार (४०) आणि सुनीता कुंभार (३४) हे आपला मुलगा हर्षवर्धन (६) याच्यासह भांडुप रेल्वेस्थानकाजवळ रिक्षा पकडून नातेवाईकाच्या घरी निघाले होते. तुळशेतपाडा येथे निघाले असताना त्यांच्या रिक्षाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या इंडिका मोटारीची  जबरदस्त धडक बसली. त्या धडकेने रिक्षा उलटली. या अपघातात हर्षवर्धन कुंभार हा सहा वर्षांचा मुलगा जबर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता तेथे तो मरण पावल्याची माहिती पोलिसांनी दिली. रिक्षाचालक हेमराज गजबले (२७) याच्यासह कुंभार दाम्पत्य किरकोळ जखमी झाले. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2013 12:06 pm

Web Title: 6 yr old dies in car auto crash in bhandup
Next Stories
1 पहिल्या पुस्तकासाठी अनुदान मिळवा आणि लेखक व्हा!
2 वाहतूक पोलिसांची सौजन्यशीलता!
3 पोलिसी खाबूगिरीचे नवे स्लॅब
Just Now!
X