दिल्लीत आम आदमी पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिला. त्याचे अनुकरण लगेचच गल्लीतही सुरू आहे. श्रीगोंदे नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने आम आदमी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भारत नहाटा यांना उमेदवारी दिली आहे.
श्रीगोंदे नगरपालिकेच्या निवडणुकीतील उमदेवारी अर्जाची छाननी झाली आहे. नहाटा यांच्या अर्जासोबत काँग्रेसचा एबी फॉर्म आहे. पक्षात निष्ठावंतांना उमेदवारी डावल्याची धुसफूस सुरू असतानाच ‘आप’च्या पदाधिकाऱ्याला काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. पालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्येच सत्तेसाठी जोरदार संघर्ष आहे.