भारतीय शालेय क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित ५८व्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी १४ वर्षांआतील मुलींच्या महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात येथील रचना विद्यालयाची विद्यार्थिनी अर्पिता देशपांडे हिची सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे.
अर्पिता नुकतीच स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरासाठी रवाना झाली असून ५७ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद पटकावले होते. त्याची पुनरावृत्ती करण्याचा मानस अर्पिताने व्यक्त केला आहे.
एकाच वयोगटाच्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी सलग दोनदा निवड होणारी अर्पिता ही सॉफ्टबॉलची पहिलीच खेळाडू आहे. तिला अशोक दुधारे, सॉफ्टबॉलचे आशियाई पंच हेमंत देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.