नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. वामन केंद्रे यांना मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या आजी-माजी विद्यार्थी परिवारातर्फे नुकतेच एका शानदार सोहळ्यात गौरविण्यात आले. ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. कमलाकर सोनटक्के यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. रवींद्र नाटय़ मंदिरमध्ये झालेल्या या सोहळ्याला ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे माजी संचालक रामगोपाल बजाज, अभिनेते सचिन खेडेकर, अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे प्रभारी संचालक प्रा. शफाअत खान, मुंबई विद्यापीठाचे राजपाल हांडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी वामन केंद्रे यांच्या आजवरच्या कारकीर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख करून, त्यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालकपदी झालेली निवड ही ‘पोएटिक जस्टिस’ असल्याचे नमूद केले. केंद्रे यांच्या या नियुक्तीने संपूर्ण भारतीय रंगभूमीलाच एक नवीन झळाळी प्राप्त होईल, अशी अपेक्षा सतीश आळेकर यांनी व्यक्त केली. तर प्रा. रामगोपाल बजाज यांनी, भारतीय रंगभूमी संपूर्ण आशिया खंडात पोहोचविण्याचा प्रयत्न प्रा. केंद्रे यांनी करावा, असे आवाहन केले. वामन केंद्रे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर उत्तमोत्तम नाटय़कृतींद्वारे आपला सृजनप्रवास सुरू ठेवावा, अशी विनंती अभिनेते सचिन खेडेकर यांनी केली. यानिमित्ताने अकॅडमीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपले गुरू प्रा. केंद्रे यांच्या नाटय़कारकीर्दीचे तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या झालेल्या जडणघडणीचे छायाचित्रांकित दर्शन रवींद्र नाटय़मंदिरच्या प्रांगणात घडवले होते.
नाटय़संमेलनातील ठराव पाठवा
पंढरपूर येथे होणाऱ्या ९४ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनात मांडावयाचे ठराव संबंधित नाटय़ परिषद सदस्यांनी सूचक व अनुमोदक यांची नावे व स्वाक्षऱ्यानिशी येत्या १० जानेवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Love Jihad, pune, Pune University
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा