बोरिवलीच्या नवसमर्थ क्रीडा प्रसारक केंद्रातील राज्यस्तरीय मल्लखांबपटू किशोर गणपत लाड हा गेले काही महिने ‘मायस्थेनिया ग्रेव्हीस’ या दुर्धर विकाराने आजारी आहे. मालाड पश्चिम येथील ‘लाइफलाइन’ रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावरील उपचारांसाठी पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असून बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे एवढा खर्च त्याच्या आवाक्याबाहेरचा आहे. जीवरक्षक औषधांची त्यांना नितांत आवश्यकता असून ती अतिशय महाग आहेत. म्हणूनच विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच क्रीडा संस्था, मंडळे, संघटना, ट्रस्ट तसेच व्यक्ती यांना आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे. दात्यांनी आपले धनादेश  Life line ICCU saurin Maternity Nursing Home या नावाने द्यावेत. अथवा गणपत शंकर लाड या नावाने २१५, दुसरा मजला, सिद्धिविनायक सोसायटी, एस. आर. ए. बिल्डिंग नं. १, न्यू लिंक रोड, कांदिवली (प.), मुंबई – ६७ या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नवसमर्थ क्रीडा प्रसारक केंद्राचे संस्थापक-अध्यक्ष दत्ताराम दुदम (९८६९१२१४१०), अतुल सामंत (९३२२२८०८१५), गणपत लाड (९९२०५५५३५९) यांच्याशी संपर्क साधावा.
कर्करोगावरील उपचारांसाठी मदतीचे आवाहन
शशांक शिवाजी गवळी हा ९ वर्षांचा मुलगा कर्करोगाने आजारी असून हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्यावर डॉ. नितीन शहा उपचार करीत आहेत. शशांकवरील उपचारांसाठी १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचे वडील शिवाजी गवळी बेरोजगार असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या वतीने दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. दात्यांनी आपले धनादेश ‘शशांक शिवाजी गवळी’ किंवा ‘हिंदुजा हॉस्पिटल अ‍ॅण्ड एम. आर. सी.’ (धनादेशाच्या मागे एच. एच. नं. १२९८४३० अ‍ॅडमिशन नं. ११९९७९९ असे नमूद करावे) नावाने द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शिवाजी गवळी (९८९२८६१२८०), संतोष सोनावणे (९३२२८११५७४) यांच्याशी संपर्क साधावा.