08 March 2021

News Flash

‘नाशिप्र’तर्फे कृतज्ञता सोहळा

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी सेवानिवृत्त प्राचार्य रामराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कृतज्ञता सोहळा झाला. या कार्यक्रमात १

| May 1, 2013 02:25 am

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी सेवानिवृत्त प्राचार्य रामराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कृतज्ञता सोहळा झाला.
या कार्यक्रमात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१२ या कालावधीत संस्थेच्या शाळांमधून सेवानिवृत्त झालेल्या १६ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. जु. स. रुंगटा हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात सत्कारार्थीच्या वतीने सेवानिवृत्त प्राचार्य रामकृष्ण भट तसेच साहाय्यक शिक्षिका वैदेही दातार, चंद्रकला जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक हे होते.
संस्थेच्या वतीने रामकृष्ण भट, वैदेही दातार, चंद्रकला जोशी, चंद्रभान टिळे, भिकाजी गुंजाळ, प्रकाश पाटील, अरविंद खर्डे, शशिकांत चौधरी, अश्विनी लाळे, सुप्रिया मुठे, शोभना गडाख, उषाकिरण दाभाडे, कोंडाजी गाडे, नीलिमा पवार, सुमन मटकर, विमल रोडे आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव अरुण पैठणकर यांनी केले. सूत्रसंचालन नेहा सोमठाणकर यांनी तर वैशाली गोसावी यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 2:25 am

Web Title: award show by nashipra
टॅग : Nashik
Next Stories
1 नाशिकमध्ये आजपासून वसंत व्याख्यानमाला
2 आसोदा दंगल: संशयितास पोलिसांचे अभय
3 काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारे धान्य जप्त; नऊ जणांना अटक
Just Now!
X