News Flash

वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा खर्च टाळून छोटय़ा मुलीला शस्त्रक्रियेद्वारे जीवनदान

जन्मदिनाच्या समारंभासाठी जमा केलेली १ लाख ७० हजार रुपयांची रक्कम दीड वर्षांच्या मुलीच्या ह्रदय शस्त्रक्रियेसाठी देऊन काँग्रेसच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे प्रदेश संयोजक संजय मोरे यांच्या

| May 31, 2013 01:48 am

जन्मदिनाच्या समारंभासाठी जमा केलेली १ लाख ७० हजार रुपयांची रक्कम दीड वर्षांच्या मुलीच्या ह्रदय शस्त्रक्रियेसाठी देऊन काँग्रेसच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे प्रदेश संयोजक संजय मोरे यांच्या मित्रपरिवाराने सामाजिक बांधिलकी जपली. ऐनवेळी मिळालेल्या या मदतीने मुलीचे आई वडिलही भारावून गेले.ऐपतीप्रमाणे
संजय मोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार आपापल्या इच्छा पैसे जमा करत होते. महिन्यापासून सुरु असलेल्या या तयारी दरम्यान मंदार व स्वाती कुलकर्णी या दांपत्याच्या दिड वर्षांच्या वैदेही या मुलीच्या हृदयास छिद्र असल्याने, त्यावरील हृदयशस्त्रक्रियेसाठी २ लाख रुपयांची गरज असल्याची माहिती समजली. मंदार कुलकर्णी हे खासगी दुकानात काम करतात तर स्वाती कुलकर्णी घरगुती व मंगल कार्यालयात स्वयंपाकाची कामे करतात. एवढी मोठी रक्कम कुलकर्णी दांपत्याला जमा करणे शक्यच नव्हते.
हे समजल्यावर मोरे यांच्या मिहस्ते ती प्रदान करण्यात आली. ‘जन्मदिनी एका व्यक्तीला तुम्ही जीवनदान दिले’ अशी भावना मंदार कुलकर्णी यांनी व्यक्त केली. यावेळी सुजाता वैद्य, छाया मगर, सवुर्णा अन्नम, रत्नप्रभा काळे, सुमित्रा अन्नम,रवींद्र सातपुते आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 1:48 am

Web Title: birthday celebration amount given to child for heart surgery
टॅग : Child
Next Stories
1 मेघराज काडादी व देशमुख यांना सोलापुरात मानवभूषण पुरस्कार
2 ‘झपाटलेला २’ ७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस
3 वैद्यकीय कचरा उचलणा-या कंपनीवर कारवाईची मागणी
Just Now!
X