पाकिस्तानमध्ये शिक्षा भोगत असलेला भारतीय कैदी सरबजितसिंग यांचे पहाटे निधन झाले. योग्य उपचाराअभावी निधन झाल्याचा आरोप करीत गुरुवारी इचलकरंजीतील शिवसैनिकांनी शिवाजी पुतळ्याजवळ निदर्शने केली. संतप्त शिवसैनिकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला.    
सरबजितसिंगच्या निधनामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. त्याचे पडसाद इचलकरंजीतही उमटले. शिवसैनिकांनी शिवाजी पुतळ्याजवळ येऊन निदर्शने केली. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहराध्यक्ष धनाजी मोरे, नगरसेवक महादेव गौड, राजू आलासे, मनोज भाट, भरत शिवलिंग, आप्पा पाटील, संजयपाटील, सचिन खोंद्रे आदींचा यामध्ये समावेश होता. पाकिस्तानचा धिक्कार असो, एक धक्का और दो पाकिस्तान को तोड दो, निष्क्रिय केंद्र शासनाचा निषेध अशा घोषणा देण्यात येत होत्या.