News Flash

करंजी शिवारात दागिने व रोकड लुटली

करंजी शिवारातून कैलास काशिनाथ लांडबिले यांच्या घरात प्रवेश करून सत्तर हजाराचे दागिने व पाच हजारांची रोकड चोरून नेली.

| August 6, 2013 01:54 am

कोपरगाव तालुक्यात तीन-चार दिवस अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला असून काल रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांनी करंजी शिवारातून कैलास काशिनाथ लांडबिले यांच्या घरात प्रवेश करून सत्तर हजाराचे दागिने व पाच हजारांची रोकड चोरून नेली. चोरटय़ांनी लांडबिले यांच्या घरात घुसल्यानंतर त्यांची आई जिजाबाई व पत्नी सविता यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चार अज्ञात चोरटय़ांवर जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी दिली.
यानंतर चोरटय़ांनी अंचलगाव शिवारात भाऊसाहेब शिंदे यांच्या वस्तीकडे मोर्चा वळवला, त्यांनी शिंदे यांच्या वडिलांना मारहाण करून त्यांच्या खिशातील दोनशे रूपये चोरले. इतर सामानाची उचकापाचकही केली पण त्यांना काही हाती लागले नाही. चोरटय़ानी दोन दिवस संवत्सर, रामवाडी, अंचलगाव  येथे धुमाकूळ घातला असून त्यांच्या दहशतीने भयभीत झालेल्या लोकांनी एकत्र येऊन गस्त सुरू केली आहे. पोलिसही दरोडेखोरांच्या मागावार आहेत. हे दरोडेखोर मराठी व हिंदी बोलणारे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 1:54 am

Web Title: cash stolen with jewellery in karanji
टॅग : Stolen
Next Stories
1 सोलापूरमध्ये चारा छावण्यांत ३२३ कोटींचा चारा फस्त
2 कराडच्या दुचाकी चोरटय़ांचे कोल्हापुरात लागेबांधे
3 सर्पदंशाने तिघांच्या मृत्यूबाबत शल्यचिकित्सकांना नोटीस पाठवा- पिचड
Just Now!
X