चतुरंगचा संगीत सन्मान आणि चैत्रपालवी उत्सव कार्यक्रमाचे येत्या ४ मे रोजी डोंबिवलीत आयोजन करण्यात आले आहे. संगीत सन्मान पुस्कार पंडित तुळशीदास बोरकर यांना देण्यात येणार आहे. संगीत शिष्यवृत्ती पुरस्कारासाठी रमाकांत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
सुयोग मंगल कार्यालय येथे संध्याकाळी साडेचार वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. संगीत उत्सवात रमाकांत गायकवाड, डॉ. राम देशपांडे यांच्या गायनाचा, हरी बागडे यांचा पखवाज वादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना देवदत्त घोगळे, कृष्णा झोगडे, सीमा व विश्वनाथ शिरोडकर साथसंगत देणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यासाठी माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, प्रसिद्ध संगीतकार विद्याधर ओक उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.