लातूरची ओळख आता सांस्कृतिक शहर म्हणून होत असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. गणेश िशदे यांनी केले.
राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वार्षकि स्नेहसंमेलन व बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख होते. प्राचार्य डॉ. एस. बी. जाधव, गोिवद कतलाकुटे, डॉ. इ. यू. मासुमदार, गोपाळ कतलाकुटे, डॉ. ओ. व्ही. शहापूरकर, प्रा. विजय दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. िशदे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी व प्रयत्नवादी बनले पाहिजे. समाजाचा उद्धार करण्यास कोणी तरी अवतार घेईल, या भ्रमात आता कोणी राहू नये. आपला व समाजाचा विकास आपल्यालाच करावा लागेल, हे लक्षात घेतले पाहिजे. समाजासाठी मी, आचार आणि विचार, आई-वडील आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता, कठोर परिश्रम व कायम आशावाद ही पंचसूत्री गोिवद कथलाकुटे यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.
विविध स्पर्धामधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. निलंगा येथे विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवात शाहूने सर्वाधिक बक्षिसे मिळवून चॅम्पियनशीप प्राप्त केली. या विद्यार्थ्यांचा गौरव या वेळी करण्यात आला. अष्टपलू कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांला शाहूश्री पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार बी.कॉम तृतीय वर्षांतील गोिवद बोंबीलवाड या विद्यार्थ्यांस घोषित करण्यात आला. प्राचार्य डॉ. एस. बी. जाधव यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन डॉ. प्रीती पोहेकर, योगेश राठोड, सोनी कांबळे यांनी केले. सचिव गोपाळ कतलाकुटे यांनी आभार मानले.