03 June 2020

News Flash

ई टीव्ही मराठीवर ‘लख लख चंदेरी सोनेरी’ दिवाळी विशेष कार्यक्रम

ई टीव्ही मराठीच्या ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ या प्रेक्षकप्रिय ठरलेल्या स्टॅण्ड अप कॉमेडी कार्यक्रमाच्या दिवाळी विशेष भागांना ‘लख लख चंदेरी सेनेरी’ असे शीर्षक देण्यात आले आहे.

| November 11, 2012 03:29 am

ई टीव्ही मराठीच्या ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ या प्रेक्षकप्रिय ठरलेल्या स्टॅण्ड अप कॉमेडी कार्यक्रमाच्या दिवाळी विशेष भागांना ‘लख लख चंदेरी सेनेरी’ असे शीर्षक देण्यात आले आहे. १२ ते १५ नोव्हेंबर असे चार दिवस कॉमेडी एक्स्प्रेसमधील सगळे विनोदी कलावंत दररोज वेगवेगळ्या विषयांवर स्कीट सादरीकरण करणार आहेत.  नवरा-बायको, सासू-सुना, शाहीर-सोंगाडय़ा अशा विषयावर अभिनय करणार आहेत. सर्वसामान्य माणूस दिवाळी कशी साजरी करतो या विषयावरही विशेष भाग दाखविण्यात येणार आहे. अभिजीत चव्हाण, सागर कारंडे, शर्मिष्ठा राऊत, समीर चौगुले, शैला काणेकर, विशाखा सुभेदार हे कलावंत सहभागी होणार आहेत. दररोज दाखविण्यात येणारे दिवाळी विशेष भाग एक तासाचे असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2012 3:29 am

Web Title: diwali spical progamme on etv
टॅग Diwali
Next Stories
1 सतीश व्यास : आधुनिक काळातील श्रावणबाळ
2 दिवाळीच्या पहाटवेळी रंगली ‘भूपाळी ते भैरवी’
3 संचालक बैठकीत मात्र शिपाई भरती लांबणीवर
Just Now!
X