लोकसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक आयोगाने गतवेळच्या तुलनेत निवडणूक भत्त्यात ५० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. महागाईची झळ निवडणूक कार्यात सहभागी झालेल्यांना बसू नये यावर बहुदा निवडणूक आयोगाने लक्ष दिले आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना भोजनाची पाकिटे अथवा आहार भत्ता दिला जातो. आहार भत्ता लोकसभा निवडणुकीप्रमाणे १५० रुपये मिळणार आहे. निवडणुकीचे काम करण्यास बहुतांश कर्मचारी नाखुष असतात. त्यामुळे जादा भत्ता देऊन त्यांना या कामात रस निर्माण करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे.
जिल्ह्यातील १५ मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीसाठी २६ हजार ३१३ (राखीव धरुन) अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त ४,२०८ मतदान केंद्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला जाणार आहे. या कामासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यास निवडणूक भत्ता दिला जातो.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यात घसघशीत वाढ करण्यात आली होती. या सुधारीत दराने यंदा विधानसभा निवडणूक भत्ता सर्वाना मंजूर केला जाईल. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या भत्त्यात चांगलीच वाढ झाल्याचे लक्षात येते. क्षेत्रिय अधिकारी, क्षेत्रीय दंडाधिकाऱ्यांना गतवेळी एकत्रितपणे ८०० रुपये भत्ता दिला गेला होता. त्यात यंदा ७०० रुपयांनी वाढ झाली. मतदान केंद्राध्यक्ष व मतमोजणी पर्यवेक्षक यांचा भत्ता गतवेळच्या तुलनेत १०० रुपये, मतदान अधिकारी व मतमोजणी सहायक यांचा भत्ता ७५ रुपये तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात प्रती दिन ५० रुपयांनी वाढ झाली आहे. मतदान व मतमोजणीच्या आधी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणारे, मतदानाचे साहित्य ताब्यात घेणारे तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष कर्तव्यार्थ उपस्थित राहणारे व राखीव अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपरोक्त दराने हा भत्ता मिळेल. तथापि, मतदान, मतमोजणी भत्त्यांचे वाटप करणारे, त्याबाबत वेतन पावती नोंदवहीचे काम करणाऱ्या लेखा कर्मचाऱ्यांना, मतदान अधिकारी व मतमोजणी सहाय्यकांना उपरोक्त दराने भत्ता मिळणार नाही.
मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावर निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते. यामुळे संबंधितांच्या भोजनाची वा अल्पोपहाराची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, मतदान केंद्रांची चार हजारहून अधिक असणारी संख्या लक्षात घेतल्यास सर्वच ठिकाणी ही व्यवस्था करणे जिकिरीचे ठरू शकते. यामुळे निवडणूक शाखेला ही व्यवस्था करणे अशक्य झाल्यास प्रती दिन प्रती व्यक्ती १५० रुपयांप्रमाणे आहार भत्ता रोख स्वरुपात दिला जाईल. मतदान व मतमोजणीच्या दिवशी निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी, फिरती पथके, होमगार्ड, ग्रामरक्षक दल, वनरक्षक दल, एनसीसी छात्र, माजी सैनिक अधिकारी, केंद्रीय निमलष्करी दल अधिकारी व कर्मचारी यांना १५० रुपयांच्या मर्यादेत भोजन पाकिटे अथवा सौम्य अल्पोपहार पुरविण्यात येईल अथवा त्या ऐवजी प्रत्येकी १५० रुपयाप्रमाणे आहार भत्ता देण्याची सूचना करण्यात आली आहे.

लोकसभेतील जादा कामांचा मोबदला अद्याप नाही
लोकसभा निवडणुकीचे अहोरात्र काम करणाऱ्या हजारो अधिकारी व कर्मचाऱ्यांना जादा कामाचा मोबदला निवडणूक आयोगाने अद्याप दिलेला नाही. नियमित निवडणूक भत्ता सर्वाना मिळाला असला तरी जादा कामापोटीचे पैसे त्यांना मिळू शकलेले नाही. साडे सहा हजार कर्मचाऱ्यांची ही रक्कम पावणे तीन कोटी रुपये आहे. त्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणाऱ्या चार हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आधीच्या जादा कामाचा मोबदला दिला नसताना आता विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सांभाळावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
nsk01

akola lok sabha marathi news
लोकसभेच्या प्रचारात विधानसभेच्या इच्छुकांची धडपड
Vanchit Bahujan Aghadi, Yavatmal,
यवतमाळमध्ये ‘वंचित’चे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास
Crimes against 252 candidates in the first phase Lok Sabha Elections
पहिल्या टप्प्यात २५२ उमेदवारांवर गुन्हे
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?