विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण नीट करता यावे यासाठी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये नियमित विविध पातळीवर प्रयत्न सुरू असतात. यासाठी अनेकदा विशेष वर्गाचे आयोजनही केले जाते, तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वर्गातच हे सर्व धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. असे असले तरी एका खाजगी संस्थेला हाताशी धरून कांदिवली येथील मदर तेरेसा इंग्रजी प्राथमिक शाळेने विशेष संभाषण वर्गाचे आयोजन केले असून त्यासाठी ९०० रुपयांचे शुल्क भरण्याचे पत्रक काढले आहे. शाळेच्या या पत्रकावर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  चारकोप परिसरातील मदर तेरेसा इंग्रजी प्राथमिक शाळेत स्पोकन इंग्रजी या विशेष वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येकाकडून ९०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क भरले नाही तर परीक्षेला बसू देणार नसल्याचे पालकांना तोंडी सांगण्यात येत आहे. यामुळे शाळेतील पालकांनी मुख्याध्यापकांकडे नाराजी व्यक्त केली आहे. खरे तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वर्गामध्येच इंग्रजी लिखाणापासून संभाषणापर्यंत सारे काही शिकविले जाते. अनेक विद्यार्थी चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलतातही. असे असतानाही शाळेने इंग्रजी संभाषणाच्या विशेष वर्गाचे आयोजन केले व त्यासाठी शुल्कही आकारले आहे. यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान अनेक इंग्रजी शाळांमध्येही संभाषण कौशल्य शिकवण्यासाठी विशेष वर्गाचे आयोजन केले जाते. या संदर्भात पालकांची सभा घेऊन त्यांना या वर्गाबद्दल कल्पना दिली होती. हे या वर्गाचे पहिले वर्ष असून जर यात यश आले तर हा वर्ग पुढच्या वर्षीही चालू ठेवण्यात येणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती देसाई यांनी सांगितले. तसेच या वर्गासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?