चोरीच्या गाडीच्या संशयावरून एकशिव (ता. माळशिरस) येथील एकास लुटल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळल्याने वडूज पोलीस ठाण्याचा बडतर्फ हवालदार महंमद सईद मज्जीद खान (वय ४०) याला उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांनी बुधवारी रात्री अटक केले असता न्यायालयाने शेखला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
एकशिव (ता. माळशिरस) येथील राजेंद्र गोरख रूपनवर आणि त्यांचे मित्र लालासाहेब कोकरे हे वडूज येथे चारचाकी गाडी खरेदीकरिता आले असताना, हवालदार ढाणे व बुधावले यांनी त्यांना अडवले. त्यांच्याजवळ दुचाकी गाडीची कागदपत्रे नसल्याने त्यांना वडूज पालीस ठाण्यात नेले. या वेळी ढाणे आणि शेख याने त्यांच्याकडून १९ हजार ५४० रुपये, एटीएम कार्ड, मोबाइल असे साहित्य काढून घेतले. तसेच ५० हजारांची रोकडही काढून घेतली होती. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी ढाणेला तत्काळ अटक केली, मात्र खान बरेच दिवस फरारी होता. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने खानचा अंतरिम जामीन रद्द केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.