पेरणीसाठी बल उपलब्ध नसल्याने निराश न होता स्वतच्या खांद्यावर जू घेऊन अहमदपूर तालुक्यातील िलगदाळ येथील अल्पभूधारक वृद्ध शेतकऱ्याने पेरणी पूर्ण केली.
मदार गुलाब सय्यद (वय ६५) या अल्पभूधारक शेतकऱ्याची ही कैफियत आहे. या शेतकऱ्याची नांदुर्गा शिवारात अडीच एकर जमीन असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. बलासह खते व बियाण्यांच्या किमतीही वाढलेल्या. अशा वेळी निराश न होता या वृद्ध शेतकऱ्याने शक्कल लढवून बाजारात दोन फणाची तिफण बनवून घेतली. या तिफणीचे जू आपल्या स्वतच्या मुलाच्या व नातलगाच्या खांद्यावर दिले. चाढय़ावर आपल्या धर्मपत्नीला उभे करून दोन दिवसांत पेरणी पूर्ण केली.
सोयाबीन, तूर, मूग या पिकांची पेरणी पूर्ण केल्यावर रासणीसाठीही अभिनव उपाय शोधला. सायकल कोळप्याच्या साह्य़ाने चिमुकल्या नातवाच्या मदतीने शेतीची रासणी पूर्ण केली. चालू वर्षी या तालुक्यात वेळेवर व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पीक परिस्थिती चांगली आहे. यात सायकल कोळप्याच्या माध्यमातून दोन कोळपे मारून तणाचे निर्मूलन केले. अशा या आगळ्या मेहनतीतून फुललेले पीक डोलू लागल्याने या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव झळकले.