11 July 2020

News Flash

सांगलीत शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न

तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील अतिक्रमिक घर काढावे या मागणीसाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या उद्वेगातून एका शेतक-याने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन

| February 26, 2014 03:50 am

तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील अतिक्रमिक घर काढावे या मागणीसाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या उद्वेगातून एका शेतक-याने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात डोंगरसोनी येथील धोंडिराम पतंगराव झांबरे (५०) हा शेतकरी सि.स.नंबर ७६मध्ये असणारे अतिक्रमित घर काढावे या मागणीसाठी गेले दोन महिने उपोषण करीत आहे. प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या उद्वेगातून त्याने मंगळवारी सकाळी जिल्हा अभिलेख कार्यालयाच्या छतावर जाऊन अंगावर रॉकेल ओतून घेतले. स्वत:ला पेटवून घेण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सायंकाळी त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2014 3:50 am

Web Title: farmer attempt to suicide in sangli
टॅग Sangli
Next Stories
1 ग्रामसेवकांची कराडला निदर्शने व बेमुदत लेखणी बंद आंदोलन
2 नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने भाजप नगरसेविकेचा राजीनामा
3 ठिबक सिंचन घोटाळय़ातील ५ आरोपींना अटकपूर्व जामीन
Just Now!
X