News Flash

मुंबईत तीन दिवसांचा चित्रपट महोत्सव

शार्दूल क्रिएशन्स आणि आर. आर. ग्रूप यांच्यातर्फे मुंबईत २५ ते २७ मे या कालावधीत चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात

| May 21, 2014 06:40 am

शार्दूल क्रिएशन्स आणि आर. आर. ग्रूप यांच्यातर्फे मुंबईत २५ ते २७ मे या कालावधीत चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात होणाऱ्या या महोत्सवात १२ चित्रपट दाखविण्यात येणार असून महोत्सवासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. पुढील महिन्यात २० ते २४ जून या कालावधीत मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मुंबईत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवात टाइमपास, दुनियादारी, रेगे, आजचा दिवस माझा, सत ना गत, फॅण्ड्री, यलो, सामथ्र्य, ७२ मैल एक प्रवास, झपाटलेला-२, भाक रखाडी ७ किलोमीटर, प्रेम म्हणजे प्रेम असतं आदी चित्रपट दाखविले जाणार आहेत. यातून आठ चित्रपटांची निवड करण्यात येणार असून निवड झालेले चित्रपट मॉरिशस येथे होणाऱ्या महोत्सवात दाखविले जाणार आहेत. या वेळी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार उपस्थित राहणार असून रसिकांनी या चित्रपट महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 6:40 am

Web Title: film festival in mumbai
Next Stories
1 देशभक्तीचा हुंकार.. ‘रॉक फ्यूजन’मधून!
2 उच्चशिक्षण व करिअरविषयक मार्गदर्शनासाठी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’
3 समुद्रकिनारा की गटारकिनारा?
Just Now!
X