News Flash

शिवाजीराव कदम यांच्याकडून दुष्काळग्रस्तांसाठी धान्य

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना येथील कदम कुटुंबीयांनी माजी महापौर शिवाजीराव कदम यांचा वाढदिवस आज साध्या पध्दतीने साजरा केला. दुष्काळग्रस्तांसाठी १ लाख रूपयांचे धान्य त्यांनी भीमा

| March 14, 2013 06:36 am

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना येथील कदम कुटुंबीयांनी माजी महापौर शिवाजीराव कदम यांचा वाढदिवस आज साध्या पध्दतीने साजरा केला. दुष्काळग्रस्तांसाठी १ लाख रूपयांचे धान्य त्यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्याकडे सुपूर्द केले. यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून समाजातील विविध घटक दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. अगदी शालेय विद्यार्थीही मुठभर धान्याचे योगदान दुष्काळग्रस्तांसाठी देत आहेत. या पाश्र्वभूमीवर त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी १ लाख रूपयांचे धान्य दुष्काळग्रस्तांसाठी देण्याची संकल्पना पुढे आणली. कदम कुटुंबीयांनी ही संकल्पना उचलून धरली आणि धनंजय महाडिक युवाशक्तीकडे धान्यवितरणाची जबाबदारी सोपविली. या वेळी धनंजय महाडिक, अ‍ॅड.श्यामराव शिंदे, रामराजे कुपेकर, आर.एन.सरनाईक, तानाजी कदम, गुणाजीराव कदम, चंद्रकांत कदम, संतोष कदम, नगरसेवक सत्यजित कदम आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 6:36 am

Web Title: food grains to famine stricken from shivajirao kadam
टॅग : Famine
Next Stories
1 बेळगाव : महापालिका जिंकली, आता लक्ष सीमावादाकडे
2 कोल्हापुरात टोलआकारणी सुरू करण्याच्या हालचाली
3 मोबाईल विक्री दुकानातून साडेदहा लाखांचा माल चोरीस
Just Now!
X