30 September 2020

News Flash

सुगाव व पांगरी रोपवाटिकांमध्ये वनविभाग उद्याने विकसित करणार

वनविभागाच्या वतीने तालुक्यातील सुगाव आणि पांगरी येथील रोपवाटिकांमध्ये वन उद्याने विकसित करण्यात येणार आहेत.

| April 20, 2013 01:05 am

वनविभागाच्या वतीने तालुक्यातील सुगाव आणि पांगरी येथील रोपवाटिकांमध्ये वन उद्याने विकसित करण्यात येणार आहेत.
अकोले शहरापासून सुमारे तीन किमी अंतरावर सुगाव येथे प्रवरा नदीच्या काठी वनखात्याची रोपवाटिका आहे. सात हेक्टर क्षेत्र असणाऱ्या या रोपवाटिकेतील अडीच ते तीन हेक्टर क्षेत्रात हे वन उद्यान विकसित करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती उपविभागीय वनाधिकारी शिवाजीराव फटांगरे यांनी दिली. या वनोद्यानात लहान मुलांसाठी बालोद्यान, जॉिगग ट्रॅक, उद्यानातून िहडण्यासाठी पाऊलवाटा, लहान मुलांसाठी खेळणी, कारंजे, झुलता फुल, झाडांभोवती ओटे, निरीक्षण मनोरा, नदीकाठी मचाण, पॅगोडा आदी सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित केल्या जाणार आहेत. स्थानिक स्वरूपाची विविध झाडेही लावण्यात येणार असून लोकांना झाडांची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक वृक्षाची माहिती दर्शविणारे फलक लावले जाणार आहेत. २५ हजार लोकसंख्येच्या अकोले शहरात लोकांसाठी एकही उद्यान अथवा चांगले मैदान नाही. शहरापासून जवळच सुगाव येथे हे उद्यान होत असल्यामुळे शहरवासीयांच्या दृष्टीने प्रवरा नदीकाठचे हे उद्यान आकर्षणाचा केंद्रिबदू ठरेल. मुळा खोऱ्यातील पांगरी येथेही वनखात्याची मोठी रोपवाटिका आहे. त्याठिकाणीही असेच उद्यान विकसित केले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2013 1:05 am

Web Title: forest department will develop gardens in a nursery of sugaon and pangari
टॅग Forest,Gardens
Next Stories
1 गॅस टाक्यांचा बेकायदेशीर साठा जप्त
2 ओबीसींच्या शिष्यवृत्तीसाठी छात्रभारतीचा आंदोलनाचा इशारा
3 कान्हूरपठारचे सरपंच काकडे यांचे पद रद्द करण्याची मागणी
Just Now!
X