बाजारात काही नवीन आले की, त्यावर गप्पा हाणण्याचा, त्यावर टिकाटिप्पणी करण्याचा नेटिझन्सचा जन्मसिद्ध हक्क. विषय नवीन गॅझेटचा असेल तर मग बघायलाच नको. त्यात आता काल-परवा लाँच झालेल्या आयफोन-६ची भर पडली आहे. आयफोन-६ची किंमत सध्या तरी परवडणारी नसल्याने त्याविषयीचे अनेक मनोरंजक किस्से, विनोद इ. इ. समाजमाध्यमांमध्ये (सोशल मीडिया) फिरत आहेत. त्यातील काही खास निवडक किस्से-विनोद..
* ‘आज मेरे पास, आयफोन ६ है, तुम्हारे पास क्या है?’ ‘मेरे पास..किडनी है.’ आयफोन ६च्या लाँचिंगनंतर ‘दिवार’ चित्रपट बनवला गेला असता, तर कदाचित असेच काहीसे डायलॉग त्यात असते.
* तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया होणार असेल तर त्वरित रद्द करा, कारण कदाचित डॉक्टर आयफोन-६ घेण्यासाठी तुमची किडनी काढून घेईल.
* किडनी गायब होण्याच्या प्रकारांमुळे एसीपी प्रद्युम्न सध्या अस्वस्थ आहे. एका प्रकरणात मृताच्या देहातून किडनी गायब झालेली पाहून तो दयाला सांगतोय, ‘नक्कीच खुन्याला आयफोन ६ घ्यायचा असेल.’
* ज्या गुजराती (कंजूष) माणसाकडे आयफोन-४ असेल त्याला मात्र चिंता करायचे कारण नाही. कारण ते तेव्हाही ‘मेरे पास आयफोन छे’च म्हणत होते.
* तुम्ही आयफोन-६ न घेता बँकॉकला जाण्याचे नियोजन करत असाल तर उत्तम. २१ हजार रुपये रिटर्न तिकिटाला, हॉटेलचे बिल दहा हजार, तीन हजार रुपये मजासचा खर्च, १७ हजाराची खरेदी, १५ हजारांची बचत करून तुम्ही भारतात येऊ शकता व एअरपोर्टवरून उच्चप्रतीचे मद्य खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे चार हजार रुपये शिल्लक राहतील. त्यामुळे आयफोन-६ घेऊच नका.
* मी गुगल वर आयफोनची किंमत शोधत होतो, तर त्याने मला ‘तू रेहने दे’ असंच म्हटलं.’
* आयफोन-६ घेण्यासाठी अ‍ॅपलने खास लोन काढले असून, त्याला ‘आय-लोन’ हे नाव देण्यात आले आहे.
* तुम्ही जर गरीब घरात जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, पण जर गरीब म्हणून मेलात तर यात दोष अ‍ॅपलचा आहे.’
* एकाने हौसेने आय-वॉच घेतलं होतं. त्याने वॉचला ‘माझी बीएमडब्ल्यू कुठेय विचारलं’ तर ‘इन युअर ड्रिम्स.’ असं उत्तर दिले.
* आयफोनचा एक फायदा नक्कीच आहे. तो तुम्ही उलटा केलात तर ‘आयफोन ९’ होऊ शकतो, त्यामुळे भविष्यातील तुमचा खर्च नक्कीच वाचेल.