शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयास बंगळुरूच्या राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेने (नॅक) पुनर्मूल्यांकन करून ‘अ’ दर्जा बहाल केला आहे. त्याबद्दल महाविद्यालय परिसरात जल्लोष करण्यात आला. ‘नॅक’च्या समितीने आपल्या अहवालात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव बावधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या बी. सी. ए. वर्गासाठी अमेरिकेतील अमित पाटील यांच्याबरोबर केलेला सामंजस्य करार, कामिनी गांधी व टाइमचे आनंद जोशी यांचे अभ्यासक्रम, राष्ट्रीय सेवा योजनेस मिळालेले पुरस्कार, बेटी बचाव अभियान, पोलीस प्रशिक्षण केंद्र, व्यावसायिक अभ्यासक्रम, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, कर्मवीर विद्या प्रबोधिनी, दिशा प्रकल्प, शिक्षकांची गुणवत्ता आदी बाबींचे परीक्षण करून ‘अ’ दर्जा दिला आहे. यात ३.०३ गुणांक मिळाल्याचे प्राचार्य डॉ.बावधनकर यांनी सांगितले.