येथील गायन समाज देवल क्लब यांच्यावतीने गोविंदराव गुणे स्मृती हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धेचे आयोजन ४ व ५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती स्पर्धा समन्वयक व प्रवक्ते श्रीकांत डिग्रजकर यांनी दिली.    
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकास गोविंदराव गुणे यांच्या स्मरणार्थ ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक त्याचप्रमाणे गुणीदास पं.जगन्नाथबुवा पुरोहित स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.या व्यतिरिक्त गेल्या दोन वर्षांपासून जयपूर-अत्रोलो घराण्याचे खलिफा उ.अजीजुद्दीन खाँ उर्फ बाबा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक श्रीमती श्रुती सडोलीकर-काटकर यांच्या तर्फे देण्यात येते. व्दितीय क्रमांकाचे ४ हजारचे पारितोषिक व प्रमाणपत्र जयपूर-अत्रोली घराण्याच्या मान्यवर गायिका सरदारबाई कारदगेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व तृतीय ३ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र कै.प्रा.द.गुं.पिशवीकर यांच्या स्मरणार्थ व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके कमलाबाई पिशवीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिली जाणार आहेत. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आयुर्वेदीय औषध निर्माते एस.जी.फायटो फार्मा प्रा.लि. हे आहेत.
 गोविंदराव गुणे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या जन्मशताब्दी वर्षांचा योग साधून आजवर या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक कलाकारांचा तीन दिवसीय युवा संगीत संमेलन ‘पालवी’ या शीर्षकाखाली आयोजित करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे डिग्रजकर यांनी सांगितले.