27 September 2020

News Flash

हाऊसिंग फेडरेशनची आज निवडणूक

मुंबईतील सुमारे १८००० सहकारी गृहनिर्माण संस्था संलग्न असलेल्या ‘दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशन’ची पंचवार्षिक निवडणूक येत्या शनिवारी, १५ जून रोजी होत आहे. हाऊसिंग फेडरेशन

| June 15, 2013 12:31 pm

मुंबईतील सुमारे १८००० सहकारी गृहनिर्माण संस्था संलग्न असलेल्या ‘दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशन’ची पंचवार्षिक निवडणूक येत्या शनिवारी, १५ जून रोजी होत आहे. हाऊसिंग फेडरेशन नावारूपाला आणण्यात महत्त्वाचे योगदान देणारे स्व. रघुवीर सामंत यांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात या निवडणुकीबद्दल बरीच उत्सुकता आहे. रघुवीर सामंत यांचा वारसा सांगणारे ‘स्व. रघुवीर सामंत पॅनेल’ प्रदीप रघुवीर सामंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष अनिल जाधव तसेच विनय शेर्लेकर, हरी गोरे, दिलीप नागवेकर, छाया आजगावकर-नेरूरकर, एम.एस. करजगीखेड आदी ज्येष्ठ विद्यमान संचालक या पॅनेलमध्ये आहेत. फेडरेशनचे विद्यमान ज्येष्ठ संचालक डी. एस. वडेर व अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री समर्थ सहकारी पॅनेल’ विरोधात आहे. सहकार क्षेत्रातील राजकुमार भोगले, सुधीर गडकरी, बबन वायदंडे, नामदेव गवंडी आदी कार्यकर्ते या पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. मतदान शनिवार, १५ जून रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर येथे होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 12:31 pm

Web Title: housing federation election today
टॅग Election
Next Stories
1 सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासासाठी उपनिबंधकांची पूर्वपरवानगी अत्यावश्यक!
2 केजोच्या प्रेमळ आग्रहापुढे एकता नमली
3 धोकादायक ७८ इमारती रिकाम्या करण्यात पालिका हतबल
Just Now!
X