07 March 2021

News Flash

विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत जॅक हेल्पलाइनची मदत

अकरावीसह कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्यासाठी मराठवाडय़ासह राज्यातील विद्यार्थ्यांना नि:शुल्क मदत करण्यास जॅक हेल्पलाइन सरसावली आहे.

| June 12, 2013 01:25 am

अकरावीसह कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्यासाठी मराठवाडय़ासह राज्यातील विद्यार्थ्यांना नि:शुल्क मदत करण्यास जॅक हेल्पलाइन सरसावली आहे.
दहावी व बारावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, धुळे, कोल्हापूर, जळगावसह देशातील बंगळुरू, हैदराबाद, नवी दिल्ली तसेच गुजरात व राजस्थान यापैकी कुठल्याही ठिकाणी कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात प्रवेश प्रक्रिया, शुल्क भरण्याची पद्धत, विविध अभ्यासक्रम, निवास-भोजन व्यवस्था आदींची माहिती दिली जाणार आहे. या बरोबरच विविध परीक्षांत अपयशी ठरलेल्यांसाठी समुपदेशन केंद्रही सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी जॅक हेल्पलाइन (०२४०-२३९१३९१) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 1:25 am

Web Title: jack helpline for students admission
Next Stories
1 अधिकाऱ्यांना शाळेत कोंडून १०२ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
2 तलावांतील गाळ काढण्याच्या कामाची व्याप्ती वाढविणार
3 जलसंधारणाच्या कामांची मुख्य सचिवांकडून प्रशंसा
Just Now!
X