आज मी ग्वाही तुम्हाला एवढी देणार आहे..आजची ही साजसंध्या सुखद होणार आहे. आतल्या अंतर मनाची पोकळी भरून काढे..गजलच्या या मैफिलीचा तुम्ही घ्या आनंद सारे..अशा शायरीने पेश केलेल्या मराठी गझलेने शनिवारची वाशीकरांची सायंकाळ मंतरली गेली. दर्दी रसिकांनी भरलेल्या सभागृहात प्रत्येक गझलला दाद मिळत होती. मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक सांज या मराठी गजलेची’ या कार्यक्रमात रसीक न्हाऊन निघाले.
मराठी साहित्यातील मोठे गझलकार सुरेश भट यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी उपस्थित होते. आप्पा ठाकूर, वैभव देशमुख, दीपक अंग्रेवार यांनी गझला सादर केल्या, तर निवेदन दत्ता बाळसराफ यांनी केले म्
 यावेळी सादर झालेल्या प्रत्येक गझलला रसिकांची दाद मिळत होती म् मराठवाडा, विदर्भातील वेगवेगळ्या प्रश्नांवर, देव-दैवतांवर, आयुष्यावर, प्रेमावर, वास्तवांवर गझला सादर करण्यात आल्या म् आप्पा ठाकूर यांनी गझलेद्वारे थेट विठ्ठलाला घातलेली साद तर अप्रतिम ठरली. ‘तूर्तास विठ्ठला तू आता असे करावे..सोडून वीट देत मागे तू पुढे सरावे, बांधून ठेवलेले सोडून दोन्ही हात.. आता तू कामात गुंतवावे, होतील हाल तेव्हा यांच्या पुढे तोही..तेव्हा तू आता लवकर फरार व्हावे’ ही गझल रसिकांची वाहवा मिळवून गेली.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी सादर झालेली गझलही लोकप्रिय ठरली. ‘बरेच काही करूनसुद्धा अजून काही बरेच बाकी..अजूनसुद्धा घरोघरी मी किती जाणांच्या हृदयात आहे. म्हणून आयुष्याचे अवघड ओझे. खूप दिवस मी पेलत आहे. अनेक त्याच्या मोहापायी वृध्दत्वाला विसरत आहे. या मराठी गजलांनी सजलेल्या सायंकाळी रसिकांकडून भरभरून दाद मिळाली म्